Sunday, September 8, 2024
Homeनगरशनी दर्शनासाठी भुयारीमार्ग झाला खुला

शनी दर्शनासाठी भुयारीमार्ग झाला खुला

सोनई |वार्ताहर| Sonai

शनिशिंगणापूर येथे मुख्य रस्त्यापासून सुरू होणारी जुनी दर्शन रांग बंद करून नव्याने बांधण्यात आलेल्या पानसनाला तीर्थ प्रकल्प योजनेतील भुयारी मार्गाने नवीन दर्शन पथास बुधवारी सुरुवात करण्यात आली.

- Advertisement -

देवस्थानच्या वाहन तळापासून सुरू होणार्‍या भुयारी मार्गाने भाविक महाद्वारासमोर निघणार असून येथून जुन्या दर्शनपथ इमारती मधून भाविक दर्शनाकरता जातील या प्रकल्पामध्ये दशावतार मूर्ती बसवण्यात आल्या आहेत दीपस्तंभ, नवग्रह मंदिराचे दर्शन घेता येईल. चाळीस फुट रुंद व आठशे फुट लांबीचा हा दर्शन पथ बनवण्यात आला आहे. दर्शन करून बाहेर जाण्याच्या मार्गावर बगीचा, पानसनाला प्रकल्प, सप्ततीर्थ बंघारा, सेल्फी पॉईंट आदीं बनवण्यात आले आहेत. मोठ्या संख्येने भाविकांनी या नवीन मार्गाने जात शनीदर्शन घेतले.

- Advertisment -

ताज्या बातम्या