Tuesday, October 22, 2024
Homeक्राईमशनिशिंगणापूर हाणामारी प्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल

शनिशिंगणापूर हाणामारी प्रकरणी 50 जणांवर गुन्हा दाखल

सोनई |वार्ताहर| Sonai

शनिशिंगणापूर येथे रविवारी दोन गटातील हाणामारी प्रकरणी 50 ते 60 जणांवर शिंगणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिंगणापूर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अजय कृष्णा ठुबे यांनी शिंगणापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की कैलास हॉटेल, आप्पा कुर्‍हाट यांच्या घरासमोर दोन गटांत मारहाण चालू असल्याने पोलीस पथक भांडण मिटवण्यासाठी गेले असता घातक शस्त्रानिशी गैर कायद्याची मंडळी जमवून आपापसात मारहाण करत होते. दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न करून सौम्य लाठीचार्ज केला परंतु दोन्ही गट शांत न होता आक्रमक होऊन घातक शस्त्राने एकमेकांना मारहाण करत असताना पोलिसांनाही मारहाण करण्यास सुरुवात केली. यात एखाद्याचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाल्याने पोलीस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी प्रसंगावधान राखून दोन्ही गटांना शांत करण्यासाठी सर्विस पिस्टलने हवेत एक राउंड फायर केला.

- Advertisement -

याप्रकरणी रोहित कुसळकर, सोनू कुसळकर, महेश कुर्‍हाट, अजय कुर्‍हाट, सागर वाघ, गणेश कुर्‍हाट, सागर कुसळकर, लखन ढगे, अर्जुन महाले, भीमा महाले, लहू धनवटे, विकास कुसळकर सर्व रा. बालाजीनगर सोनई व इतर 50 ते 60 अनोळखी इसमां विरुद्ध बीएनएस कलम 109,132, 121(2), 189(2), 189(4), 189(3), 191(2), 191(3), 190, 189(5), 195(1), 352, 35(1)(2), 223 महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 135, आर्म अ‍ॅक्ट 4/25, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सुरज दत्तात्रय कुसळकर, लहू रामनाथ धनवटे, रोहित विठ्ठल कुसळकर, सिद्धार्थ संतोष कुसळकर, रोहित ज्ञानदेव कुसळकर, सर्व रा. सोनई. महेश अशोक कुर्‍हाट घोडेगाव रोड. गोरख उत्तम भराडे, रा. शनिशिंगणापूर या आरोपींना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या