उंबरे |वार्ताहर| Umbare
राहुरी (Rahuri) तालुक्यातील शनिशिंगणापूर रस्त्यावरील (Shani Shingnapur Road) पिंप्री अवघड शिवारात आज मंगळवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात (Accident) झाला. मिनीबस आणि रिक्षा यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत तीन भाविकांचा जागीच मृत्यू (Death) झाला असून दोन जण गंभीर जखमी (Injured) झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक जिल्ह्यातील भाविकांना घेऊन जाणारी रिक्षा आणि समोरून येणारी मिनीबस यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडकेचा जोर इतका भीषण होता की रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला, तर मिनीबस रस्त्याच्या खाली जाऊन पलटी झाली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.
या अपघातात रिक्षामधील तीन भाविकांचा (Devotee Death) जागीच मृत्यू झाला. तर दोन जण गंभीर जखमी (Injured) झाले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. मिनीबस मधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने स्थानिक नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची माहिती मिळताच राहुरी पोलीस (Rahuri Police) घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. शनिशिंगणापूर दर्शनासाठी (Shani Shingnapur) निघालेल्या भाविकांवर अचानक काळाने घाला घातल्याने मृतांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या अपघातामुळे (Accident) परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.




