Monday, May 27, 2024
Homeनगरशिंगणापुरात पाच लाख भाविकांचे शनीदर्शन

शिंगणापुरात पाच लाख भाविकांचे शनीदर्शन

शनिशिंगणापूर |वार्ताहर|ShaniShingnapur

अमावस्या व श्रावणातील शेवटचा शनिवार तसेच सलग सुट्टी यामुळे शनीअमावस्या यात्रेला शनीशिंगणापूर येथे सुमारे पाच लाख भाविकांनी दर्शन घेतले..

- Advertisement -

रात्री 12 वा.पुणे येथील राहुल गोडसे, महेंद्र पारडे, पहाटे संभाजीनगरचे माजी खासदार चंद्रकांत खैरे,ऑस्ट्रेलियचे राकेश कुमार, दुपारी मुंबईचे शनिभक्त सौरभ बोरा, झिम्बाब्वेचे जयेश शहा, आदर्श गाव हिवरे बाजारचे पोपट पवार यांच्या हस्ते आरती विधिवत पूजा करण्यात आली.

वडाळा बहिरोबा येथे कंटेनर डंपरवर धडकला

सायंकाळी ओरिसाचे शनिभक्त नब किशोर दस यांच्या हस्ते आरती होऊन संकल्प केलेला कलश शनिदेवाला अर्पण करण्यात आला.

शुक्रवारी रात्री पासून भाविकांची गर्दी वाढत शनिवारी दिवसभर गर्दी झाली होती. दिवसभर ढगाळ वातावरण, ऊन पडत होते, त्यामुळे उकाडा जाणवत होता. दुपारी भाविकाची गर्दी कमी दिसत होती. शनिचौथर्याच्या काही अंतरावर भाविकांची दर्शन रांगेत गर्दी केली होती.

रस्ते दुरुस्तीत ‘वाढीव खर्चा’चे विघ्न

या निमित्ताने प्रवेशद्वार, मंदिरपरिसर, शनिचौथर्‍याच्या ठिकाणी विद्युत रोषणाई, आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. ठिकठिकाणी भाविकांना दिल्ली, हरियाणा, येथील भाविक भंडारा प्रसादाचे शनिभक्तांकडून वाटप करण्यात येत होते.पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पार्किंग व्यवस्था घोडेगाव रोड वरील ग्रामीण रुग्णालयात, मुळा कारखानाच्या काही अंतरावर, नगर औरंगाबाद रोडवरील या ठिकाणी करण्यात आल्याने भाविकांना दुरवरून पायी चालत यावे लागत होते. खाजगी वाहतुकीची साधने मोठ्या प्रमाणात असल्याने भाविकांकडून अवाढव्य पैसे आकारण्यात येत होते.

चोरट्यांचा चक्क कोंबड्यांवर डल्ला

दिवसभरात सुरतचे ओरिसाचे शनिभक्त नबकिशोरी दस, आ. जनक पटेल,आ.प्रफुल पनशेरीया, माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी मंत्री शिवाजी कर्डीले, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, उदयन गडाख यांच्यासह अनेक मान्यवरांनी विधिवत पूजा करून शनिदर्शन घेतले.

भाजपचे गुजरात हुन आलेले आ. जनक पटेल व आ. प्रफुल पनशेरीया यांचे स्वागत भाजपचे नेवासा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब फुलारी, भाजप ओबीसी तालुका अध्यक्ष देविदास साळुंके, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी केले.

भाविकांना शनिप्रसादबर्फी नेण्यासाठी नियोजन नसल्याने अक्षरशः प्रसाद स्टॉलवर भाविकांना रेलचेल करावी लागत होती. काही अंतरावरून पायी यावे लागल्याने नाराजी व्यक्त केली जात होती.

पत्रकार विजय खंडागळे व पोलीस पाटील सायराम बानकर भाविकांची चौकशी करून उपचारासाठी मदत करत होते. राज्याच्या कानाकोपर्‍यातुन यावेळी पाच लाखाहून अधिक भाविक आल्याचे देवस्थानच्यावतीने सांगण्यात आले. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, विकास बानकर, पोपट शेटे, आप्पासाहेब शेटे, अ‍ॅड. सयाराम बानकर, बाळासाहेब बोरुडे, आप्पा कुर्‍हाट आदी पदाधिकारी, कार्यकारी अधिकारी जी. के. दरंदले हे व्यवस्था वर लक्ष ठेऊन होते. वशेष अतिथीचा सन्मान कार्यकारी अधिकारी जी. के. दरदले, व उपकार्यकरी अधिकारी नितीन शेटे हे करत होते. दिवसभर भाविकांचा ओघ चालू होता. यात्रा शांततेत पार पडली.

- Advertisment -

ताज्या बातम्या