Saturday, May 2, 2026
HomeनगरSonai : शनी चौथर्‍यावरुन सर्वांना मोफत दर्शन व्यवस्था करा

Sonai : शनी चौथर्‍यावरुन सर्वांना मोफत दर्शन व्यवस्था करा

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांचा इशारा

सोनई |वार्ताहर| Sonai

शनि शिंगणापूर येथे भाविकांना चौथर्‍यावर जाऊन दर्शनासाठी घेतले जाणारे 500 रुपयांचे शुल्क तात्काळ बंद करावे. तेथे सर्वांना समान आणि मोफत दर्शनाची व्यवस्था करावी, अशी मागणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केली आहे. अन्यथा यासाठी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे.

- Advertisement -

देसाई यांनी महिलांना चौथर्‍यावरील दर्शन खुले करण्यासाठी आंदोलन केले होते त्यामुळे विश्वस्त मंडळाने यावर तोडगा काढत ज्या महिलांना चौथर्‍यावर जायचे असेल त्या सर्वांना चौथरा खुला केला पण येथील रूढी व परंपरेला जपत परिसरातील महिला अजुनही चौथर्‍यावर जाणे टाळतात. काही दिवसांपूर्वी देवस्थानच्या विश्वस्त मंडळाने तिरूपती बालाजी व शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर भाविकांच्या झटपट दर्शनासाठी सशुल्क दर्शनाची सोय केली. यामुळे देवस्थानच्या दानातही मोठी वाढ झाली आहे. नुकतेच सरकारने विश्वस्त मंडळ बरखास्त करून हे देवस्थान ताब्यात घेतले असून येथे जिल्हाधिकारी यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.

तृप्ती देसाई यांनी शनि मुर्तींचे चौथर्‍यावरील दर्शन 500 रुपयांचा पास बंद करून सर्वांसाठी हे दर्शन खुले करण्याची मागणी केली आहे. त्यातच देवस्थानच्या मागील विश्वस्त मंडळाने सरकारच्या विरोधात विश्वस्त बरखास्तच्या विरोधात न्यायालयात अपील केले आहे. न्यायालयाने 10 नोव्हेंबर ही तारीख दिलेली असल्याने त्यावेळी काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सर्वसामान्य भाविकांना पावती
सर्वसामान्य भाविकांना चौथर्‍यावरून दर्शन घेण्यासाठी 500 रूपयाची पावती फाडावी लागते. परंतु मंत्री, आमदार यांच्यासह राजकीय नेते तसेच राज्यातील अनेक अधिकार्‍यांनाही मोफत सोडले जाते. याबाबत शनीभक्तांमध्ये मोठी नाराजी असून नवीन समितीने सर्वांसाठी चौथरा खुला करावा अशी मागणी जोर धरत आहे.

ताज्या बातम्या

Rohit Pawar : उन्हात होरपळ, विजेचा खेळखंडोबा; आ. रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली...

0
जामखेड । तालुका प्रतिनिधी कर्जत-जामखेड तालुक्यातील तीव्र वीजटंचाई आणि अनियमित वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर आज आ. रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कर्जत येथील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात...