Wednesday, February 4, 2026
HomeनगरShani Shingnapur Temple Trust : शनी देवस्थानचे १६८ कर्मचारी तात्काळ निलंबित; ११४...

Shani Shingnapur Temple Trust : शनी देवस्थानचे १६८ कर्मचारी तात्काळ निलंबित; ११४ मुस्लिम कर्मचाऱ्यांचा समावेश

सोनई (वार्ताहर)

शनिशिंगणापूर देवस्थानच्या मुस्लिम कर्मचाऱ्यांना देवस्थानाने कामावरून काढून टाकावे, यासाठी शनिवार दि. १४ रोजी आंदोलन होणार होते. त्या पार्श्वभूमीवर शिंगणापूर विश्वस्तांची तातडीची बैठक झाली. त्यात सर्व ११४ मुस्लिम कर्मचारी व आणखी ५४ कर्मचारी यांना देवस्थानने कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती देवस्थानकडून देण्यात आली.

- Advertisement -

मुस्लिम कर्मचाऱ्यांना देवस्थानने कामावरून कमी करावे, यासाठी भाजपचे ऋषिकेश शेटे यांच्यासह अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. यावेळी देवस्थानच्या वतीने वतीने सरचिटणीस आप्पासाहेब शेटे यांनी सांगितले की, नियमित नसलेल्या किंवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आम्ही काढून टाकले आहे. कामावर घेण्याचा किंवा कमी करण्याचा अधिकार देवस्थानला असून नियमानुसार आम्ही कारवाई केली आहे.

YouTube video player

जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये मुस्लिम समाजाचे १०० पेक्षा जास्त तरुण कामावर घेण्यात आल्याची जोरदार चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असून, त्याचबरोबर या देवस्थानमध्ये कर्मचाऱ्यांमार्फत कोट्यवधी रुपयांचा बनावट अॅप घोटाळा करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. याप्रकरणी जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांना निवेदनही देण्यात आले आहे.

दरम्यान, शनिशिंगणापूर देवस्थानच्या विश्वस्तांनी मुस्लिम समाजाचे कर्मचारी कामावरुन काढून टाकावेत, यासाठी आज शनिवार दिनांक १४ जून रोजी दुपारी ४ वाजता सकल हिंदू समाज बांधवांच्यावतीने शिंगणापूर येथे आंदोलन करण्यात येणार आहे. अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप, सागर बेग आणि तुषार भोसले यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केल जाणार आहे.

ताज्या बातम्या

Online Gaming : धक्कादायक! ऑनलाईन गेमचा नाद अन् तीन सख्या बहिणींची...

0
गाझियाबाद । Ghaziabad उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये ऑनलाईन गेमिंगच्या व्यसनातून तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींनी टोकाचे पाऊल उचलल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. साहिबाबाद परिसरातील भारत सिटी...