शनीशिंगणापूर |वार्ताहर|Shanishinganapur
शनी शिंगणापूर येथे शनीअमावास्येनिमित्त सुमारे तीन लखाहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. राहुरी-शनीशिंगणापूर रस्ता दुतर्फा चालू होता. देवस्थान समितीच्या वतीने भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजन करण्यात आले होते.
शेवगावचे अप्पर पोलीस अधीक्षक सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनख़ाली सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र करपे व सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
शनिचौथरा विविध फुलांनी सजवला होता. याप्रसंगी शनिभक्तासह विविध मान्यवर शनिदर्शन घेण्यासाठी दाखल होत होते. विशेष अतिथींचे स्वागत अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, सरचिटणीस आप्पासाहेब शेटे, सरपंच बाळासाहेब बानकर,पोलिस पाटील अॅड. सयाराम बानकर यांच्यासह देवस्थाचे विश्वस्त हे करत होते.
देवस्थानकड़े येणार्या-जाणार्या वाहनांच्या पार्किंगचे नियोजन 2 ते 3 किलोमीटर इतक्या लांब अंतरावर केल्याने येणार्या जाणार्या भाविकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.
मुळा कारखाना, कांगोणी, संभाजीनगर, हनुमानवाड़ी, घोड़ेगाव रोड, पानसनाला आदी मार्गावर भाविकांच्या वाहनाची पार्किंग व्यवस्था केली होती.
पहाटेची आरती माजी खासदार चंद्रकांत खैरे व दुपारची आरती झिम्बाब्वेचे उद्योगपती जयेश शहा सायंकाळची आरती तिरुपती देवस्थानचे विश्वस्त सौरभ बोरा व पुणे येथील डेंटल महाविद्यालयाचे डॉ. हेगडे यांच्या हस्ते झाली.
जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार शिवाजी कार्डिंले यांनी धो धो पाऊस पडून पेरणी व्हावी असे शनिचरणी साकडे घातले.
दिवसभरात महिपती देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे, पद्मश्री पोपटराव पवार, राज्याचे उद्योग सचिव प्रजाक्ता लवंगारे, सौरभ बोरा, रामभाऊ जगताप, दीपक पटारे,ब ाबासाहेब भोगे, भाऊराव कुर्हे, मराठा महासंघाचे संभाजी दहतोंडे आदी उपस्थित होते.
पहिल्यांदाच महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार श्री. बिरादार यांच्यासह दोन नायब तहसीलदार, चार तलाठी व दोन सर्कल यांची यात्रेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती.
आरोग्य विभागाचे डॉ, राजेंद्र कसबे व डॉ. विधाटे यांनी भाविकांची आरोग्य तापसणी करीता सेवा दिली.