Thursday, June 13, 2024
Homeनगरशनीजयंती निमित्त सुमारे दोन लाख भाविकांचे दर्शन

शनीजयंती निमित्त सुमारे दोन लाख भाविकांचे दर्शन

शनीशिंगणापूर |वार्ताहर| Shanishingnapur

- Advertisement -

शनीशिंगणापूर येथे शनीजयंती निमित्त काल सुमारे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतले. सकाळची आरती ऑस्ट्रेलियाचे राकेश कुमार, दुपारची आरती जयेश शहा, व सौरभ बोरा तर सायंकळी दिल्लीचे सौरभ बोथरा यांच्या हस्ते करण्यात आली. काशी येथून व दोन दिवसापूर्वी प्रवरासंगम येथून कावड धारकांनी आणलेल्या गंगाजलाची स्व.बाबुराव बानकर यांच्या निवासस्थानापासून मिरवणूक काढण्यात आली होती.

11.30 वाजता शनी आरती,विविध प्रकारची फळे, फुले, तेल अर्पण करून शानिदेवाला जल अभिषेक घालण्यात आला. यावेळी चौथरा सह मंदिर परिसरात आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. बँडपथक, आतषबाजी, मंदिर परिसरात येताच शिस्तबद्ध कावडधारकांनी चौथर्‍यावर जाऊन शनिदेवाला पवित्र जलाभिषेक घालून दर्शन घेतले.
शनीमहाराजांचा जयघोष करून प्रसाद वाटप करण्यात येत होते.

देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, उपाध्यक्ष विकास बानकर, सरचिटणीस आप्पासाहेब शेटे, कोषाध्यक्ष पोपटराव शेटे, नितीन शेटे व विश्वस्त मंडळ हे सुविधा निर्माण करून देत होते. पोलीस उपनरीक्षक खगेंद्र टेभेकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

- Advertisment -

ताज्या बातम्या