अहिल्यानगर । Ahilyanagar
शनिशिंगणापूर देवस्थानचे माजी विश्वस्त आणि सध्याचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी राहत्या घरी छताला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
- Advertisement -
ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला असून, त्यांच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध घेतला जात आहे. स्थानिक प्रशासन आणि देवस्थान मंडळाकडूनही या घटनेची गंभीर दखल घेण्यात आली आहे.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. तपास पूर्ण झाल्यावरच आत्महत्येचे नेमके कारण समोर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे.




