Friday, May 31, 2024
Homeनगरशनीशिंगणापुरात मटक्यासह अवैध व्यवसाय तेजीत

शनीशिंगणापुरात मटक्यासह अवैध व्यवसाय तेजीत

शनीशिंगणापूर (वार्ताहर) – राज्यात बंदी असलेल्या गुटखा व माव्याची शनीशिंगणापुरात ठिकठिकाणी टपर्‍यांवर खुलेआम विक्री सुरू आहे. तसेच मध्यंतरी काही काळ थंडावलेला मटका-जुगार व्यवसाय पुन्हा फोफावला आहे.
दररोज हजारो रुपयांचा बेकायदेशीररित्या मावा-गुटख्यासह मटका जुगारातून कमालीची देवाण घेवाण केली जात आहे. छुप्या मार्गाने होत असलेल्या दारू विक्रीमुळे प्रतिष्ठित व्यापारी, शाळकरी मुली, मुले, महिला, फिरण्यासाठी ये-जा करणार्‍या नागरिकांनी संताप व्यक्त केला असून जिल्हा पोलीस प्रमुखांनी धडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.

शनिशिंगणापुरात ऑनलाईन मटका व चिठ्ठी मटक्याचा सुळसुळाट झाल्याने या मोहामध्ये तरुणाई अडकली आहे. आठवड्यापूर्वी जोरात मटका चालू असतानाच पोलिसांना चुकवून मोबाईलवरच मेसेज घेतले जात आहेत.
कधी कधी व्हॉट्सअ‍ॅपचाही वापर होत असल्याची माहिती एका मटका खेळणार्‍याकडून मिळाली आहे. निकालही मोबाईलवर आल्याने पैशाची मोठी देवाण घेवाण होत आहे. याकडे अनेक तरुण आकर्षित होत आहेत. दिवसेंदिवस मटका खेळण्यासाठी गावात, परिसरात मोठी गर्दी होत असते. या मटका खेळवणार्‍यांवर सायबर गुन्हे अंतर्गत कारवाईची मागणी होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या