मुंबई | Mumbai
बद्रीनाथ ज्योतिर्मठ पीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी आज मुंबईत (Mumbai) राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्री या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी ठाकरेंची भेट घेतल्यानंतर माध्यमांशी बोलतांना विविध राजकीय विषयांसह धार्मिक विषयावर सडेतोड भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी केदारनाथ मंदिरातून चोरी झालेल्या सोन्याचा मुद्दा उपस्थित करत टीका केली.
हे देखील वाचा : शरद पवारांसोबत भेटीत काय चर्चा झाली? भुजबळांनी पत्रकार परिषदेत सगळचं सांगितलं
यावेळी बोलतांना स्वामी अविमुक्तेश्वरानंद (Swami Avimukteswarananda) म्हणाले की, “उत्तराखंडमधील केदारनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील सोने चोरी करून त्याठिकाणी पितळ ठेवले असल्याचा आरोप मागच्या वर्षी पहिल्यांदा करण्यात आला होता. मंदिरातील पुजाऱ्यांनीच हा आरोप केला होता. मात्र या आरोपाची छाननी करण्यास मंदिर समितीने ठाम विरोध दर्शविला.मंदिराचे पुजारी आणि चारधाम महापंचायतीचे उपाध्यक्ष संतोष त्रिवेदी यांनी मागच्यावर्षी सोशल मीडियावर व्हिडीओ पोस्ट करून २२८ किलो सोने चोरी झाल्याचा आरोप केला होता.मात्र, याची चौकशी का होत नाही? असा सवाल अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला.
हे देखील वाचा : छगन भुजबळ शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर; कारण अद्याप गुलदस्त्यात
तसेच केदारनाथमधील (Kedarnath) सोन्याच्या (Gold) चोरीनंतर आता दिल्लीत केदारनाथ बांधणार आहेत? त्यामुळे आता आणखी एक घोटाळा (Scam) होणार आहे. केदारनाथ मंदिरातील (Kedarnath Temple) सोन्याची चोरी झाल्यानंतर त्याचा तपास करण्यासाठी समिती का नाही स्थापन केली? असाही प्रश्न स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांनी उपस्थित केला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा