Sunday, May 19, 2024
Homeनगरशांताबाई कोपरगावकरांची राज्य महिला आयोगाकडून दखल

शांताबाई कोपरगावकरांची राज्य महिला आयोगाकडून दखल

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

जुन्या पिढीतल्या ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई कोपरगांवकर यांची परिस्थिती सध्या बिकट बनली आहे. याची दखल राज्य महिला आयोगाने घेतली आहे. शांताबाई यांची महिला बाल विकास विभागामार्फत वृद्धाश्रमात व्यवस्था करावी, असे निर्देश अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत.

- Advertisement -

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी ट्विटद्वारे याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं, तमाशा कलावंत शांताबाई कोपरगावकर या ज्येष्ठ मराठी कलाकारावर उतारवयात दयनीय अवस्थेत राहण्याची वेळ आली आहे, अशा आशयाच्या बातम्या माध्यमातूनसमोर आल्या आहेत.

आयोगाच्यावतीने तातडीनं जिल्हा महिला बालविकास अधिकारी नगर यांना संपर्क करण्यात आला आहे. यांची महिला बाल विकास विभागामार्फत वृद्धाश्रमात व्यवस्था करावी असे निर्देश अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. शांताबाईंना राज्य शासनाच्या योजनांमधून सन्मानजनक मानधन मिळावं, निवृत्ती वेतन मिळावं यासाठी आयुक्त, महिला बाल विकास यांना पत्र लिहून शांताबाईंना मदत मिळवून देण्यासाठीचे निर्देश आयोग देत आहे, असं चाकणकर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ज्येष्ठ तमाशा कलावंत शांताबाई यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामुळं त्या अचानक चर्चेत आल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या