Monday, May 27, 2024
Homeनगरजामखेड बाजार समितीत ईश्‍वर चिठ्ठीचा कौल भाजपला!

जामखेड बाजार समितीत ईश्‍वर चिठ्ठीचा कौल भाजपला!

जामखेड | प्रतिनिधी

जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी भाजपचे शरद कार्ले तर उपसभापती पदी राष्ट्रवादीचे कैलास वराट हे निवडूण आले आहेत.

- Advertisement -

जामखेड बाजार समितीमध्ये भाजपचे आ. प्रा. राम शिंदे यांच्या पॅनलला व राष्ट्रवादीचे आ. रोहित पवार यांच्याही पॅनलला समान ९-९ जागा मिळाल्या होत्या. यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. दोन्ही गटांनी मतमोजणी झल्यापासून आपापले सदस्य फुटू नये म्हणून सहलीसाठी पाठवले होते.

आज सभापती व उपसभापती पदासाठी निवडणूक झली. सभापती पदासाठी भाजपकडून शरद कार्ले व राष्ट्रवादीचे सुधीर राळेभात यांनी अर्ज भरले होते. उपसभापती पदासाठी भाजपाचे सचिन घुमरे व राष्ट्रवादीचे कैलास वराट यांनी अर्ज भरले होते.

मतदानासाठी दोन्हीकडे समान संख्याबळ असल्याने दोन्ही निवडी चिठ्ठी पद्धतीने करण्यात आल्या. आज सकाळ पासून बाजार समिती परिसरात दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. परंतु तितकाच कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

सभापती निवड जाहीर होताच भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुलाल उधळत जल्लोष केला. तसेच सभापतींची विजयी मिरवणूक काढण्यात आली

- Advertisment -

ताज्या बातम्या