Saturday, May 4, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार पुन्हा रुग्णालयात, तीन आठवड्यात ३ शस्त्रक्रिया

शरद पवार पुन्हा रुग्णालयात, तीन आठवड्यात ३ शस्त्रक्रिया

मुंबई :

राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली. गेल्या तीन आठवड्यात शरद पवार यांच्यावर ही तिसरी शस्त्रक्रिया झाली आहे.

- Advertisement -

शरद पवार यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार – राजेश टोपे

१२ एप्रिल रोजी शरद पवार यांच्या पित्ताशयाची शस्त्रक्रिया झाली होती. त्यापुर्वी ३० मार्चला ब्रीच कॅण्डी रुग्णालयातच शस्त्रक्रिया करण्यात आली होती. दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आजही ट्विट करुन, पवारांच्या प्रकृतीची माहिती दली. “आमचे पक्षाध्यक्ष शरद पवार साहेब काल संध्याकाळी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात अॅडमिट झाले. त्यांच्यावर गॉल ब्लॅडर शस्त्रक्रिया झाली होती. त्याच्या नियमित तपासणीसाठी ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांची प्रकृती सुधारत आहे”, असे नवाब मलिक म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या