Friday, April 25, 2025
HomeराजकीयSharad Pawar : "मी ज्योतिषी नाही, पण मविआला…"; मतदानानंतर शरद पवारांचं मोठं...

Sharad Pawar : “मी ज्योतिषी नाही, पण मविआला…”; मतदानानंतर शरद पवारांचं मोठं विधान

बारामती । Baramati

राज्यात आज विधानसभा निवडणुकीची (Assembly Election 2024) रणधुमाळी सुरू आहे. शरद पवार यांनी बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील मतदान केंद्रावर सकाळी नऊ वाजता कुटुंबासह मतदान केलं आहे. यावेळी बोलताना शरद पवार यांनी महाराष्ट्रात सत्तापरिवर्तनाचे संकेत दिले आहे.

- Advertisement -

मी काही ज्योतिषी नाही. पण एकूण चित्र असं दिसतंय की, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला बहुमत मिळेल, असे शरद पवार यांनी सांगितले. मला असं दिसतंय की, इकडे सत्तापरिवर्तन होईल, लोकांना बदल अपेक्षित आहे, असेही शरद पवार यांनी म्हटले. यावेळी शरद पवार यांनी अजित पवारांनी महायुतीला बहुमत मिळण्याचा जो दावा केला होता, त्याची खिल्ली उडवली.

तसेच, अजित पवारांवर कसला अन्याय? चारवेळा उपमुख्यमंत्री पद, अनेक वर्ष मंत्रीपद, सगळी सत्ता त्यांच्याकडे आणि अन्याय झाला म्हणता? असा उलटा सवाल शरद पवारांनी पत्रकारांना केला. पत्रकारांनी त्यांना अजित पवार यांच्या सांगता सभेचा संदर्भ सांगत या सभेमध्ये आशाताई पवार यांनी लिहिलेले एक पत्र वाचून दाखवण्यात आले होते. त्यामध्ये अजित पवार यांच्यावर मोठा अन्याय झाला असा उल्लेख करण्यात आला होता. त्याविषयी विचारले असता, शरद पवार म्हणाले, ”यांना अनेक वर्षे सत्ता मिळाली. चारवेळा उपमुख्यमंत्री मिळाले. अनेक वर्ष मंत्रिपद मिळाले. त्यांच्यावर कसला अन्याय झाला..? युगेंद्र पवार हे नवखे आहेत. त्यांना संधी मिळायला हवी”, असंही पवार म्हणाले.

शरद पवार यांनी राज्यातील नागरिकांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. पवार म्हणाले, महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या हातात असून प्रत्येक नागरिकानं मतदानाचा हक्क बजावला हवा. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात ६७ टक्के मतदान झाले होते. तर ईशान्येकडील राज्यांमध्ये ७५ ते ८० टक्के मतदान झाले. त्यामुळे मतदानाच्या टक्केवारीत राज्याने मागे राहणे योग्य नाही. त्यामुळे माझं आवाहन आहे, मतदानाचा हक्क प्रत्येकाने बजावावा. जो राजकीय पक्ष व उमेदवार योग्य वाटेल, त्यांना मतदान करा, असे आवाहन पवार यांनी केले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...