Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयSharad Pawar on Sambhaji Bhide : संभाजी भिडे प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची माणसं...

Sharad Pawar on Sambhaji Bhide : संभाजी भिडे प्रतिक्रिया द्यायच्या लायकीची माणसं आहेत का?; शरद पवारांचा संताप

पुणे । Pune

मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे राज्यात आंदोलन करत आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपूर्वी संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन आरक्षणाला पाठिंबा दिला होता.

- Advertisement -

मात्र याच संभाजी भिडे यांनी आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून यु-टर्न घेतला आहे. मराठा म्हणजे वाघ आणि सिंह… आरक्षण कुठे घेऊन बसलात? असा सवाल संभाजी भिडे यांनी केला आहे. तर मराठ्यांना उभा देश चालवायचाय, आरक्षण कुठून काढलं? असे वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.

यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना विचारलं असता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार चांगलेच संतापले. यावेळी माध्यम प्रतिनिधींनाही त्यांनी फैलावर घेतलं. यावेळी, “संभाजी भिडे यांच्यावर वक्तव्य करण्याच्या लायकीची ती माणसं आहे का, असा सवाल शरद पवार यांनी केला. पुण्यातील मोदीबाग इथं शरद पवार यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली, यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला.

हे हि वाचा : सीमेवर जवानांचं रक्षाबंधन, मुस्लिम महिलांनी बांधल्या राख्या… पाहा VIDEO

संभाजी भिडेंबाबत प्रश्न सुरू होताच तो पूर्ण व्हायच्या आत शरद पवारांनी त्यावर नाराजी व्यक्त करताना प्रतिक्रिया देणार नसल्याचं नमूद केलं. संभाजी भिडे वगैरे काय प्रतिक्रिया देण्याच्या लायकीची माणसं आहेत का? काहीही प्रश्न विचारता का? म्हणूनच मी तुम्हाला भेटायचं नाही मी म्हणत होतो. हल्ली कसेही प्रश्न विचारतात. एकंदर आपल्या लोकांचा दर्जा फार उतरलेला आहे. संभाजी भिडे आणि अमुक-तमुक.., असं म्हणत शरद पवारांनी त्यांची प्रतिक्रिया आवरती घेतली.

संभाजी भिडे काय म्हणाले होते?

मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठलं काढलंय? सिंहांनी सर्व जंगल सांभाळायचं आहे. मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात, हे मराठ्यांच्या ज्या दिवशी लक्षात येईल, त्यादिवळी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल. ते त्यांच्या लक्षात येत नाहीय. ते दुर्देव आहे. मराठा म्हणजे वाघ आणि सिंह, आरक्षण कुठे घेऊन बसलात? असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे. आरक्षण कुठून काढलंय? असा सवाल भिडेंनी उपस्थित केला आहे.

हे हि वाचा : उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना बाहेर पडावे लागले; शिंदेंचा गंभीर आरोप

जरांगेंचे प्रत्युत्तर

भिडेंना प्रत्युत्तर देताना जरांगेंनी फडणवीसांवर निशाणा साधला. हे शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत. याला-त्याला दोष देऊन उपयोग नाही. जंगल आमचं आहे ना, मग वाघ आरक्षणाची शिकार करणार. कशाला लागतंय आरक्षण, हे ज्या-ज्या संघटनेत पक्षात मराठ्यांची पोरं आहेत, त्यांना माहिती आहे. कारण त्या पक्षाचा किंवा संघटनेचा झेंडा उचलून तो आपल्या लेकरांचं बहीण-भावाचं कल्याण करू शकत नाही. त्यांना आरक्षण लागणार आहे, असे भूमिका जरांगे यांनी मांडली.

देवेंद्र फडणवीसांमुळे भाजपपासून मराठा लांब चालला आहे. आता ह्यांच्यापासूनही जाईल. आम्हीही छत्रपतींच्या विचारांचे हिंदू आहोत. आम्ही आमचं आरक्षण मिळवू. देवेंद्र फडणवीस एक-एक अस्त्र काढत आहेत, आता हे नवीन अस्त्र काढलंय, अशी टीका जरागे यांनी केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : मोठी बातमी! प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस...

0
कोल्हापूर | Kolhapur छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल...