Monday, November 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजSharad Pawar : "पुढच्या पिढीसाठी युगेंद्रला निवडून द्या"; शरद पवारांचे बारामतीकरांना आवाहन

Sharad Pawar : “पुढच्या पिढीसाठी युगेंद्रला निवडून द्या”; शरद पवारांचे बारामतीकरांना आवाहन

बारामती | Baramati

गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या (Vidhansabha Election) प्रचारतोफा आज थंडावल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर बारामती विधानसभा मतदारसंघात आज दोन्ही पवारांच्या सांगता सभा पार पडल्या. यात शरद पवार सभेत काय बोलणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. यानंतर सभेला संबोधित करतांना शरद पवारांनी “बारामतीला (Baramati) पुढच्या पिढीची गरज आहे त्यासाठी युगेंद्र पवारांना निवडून द्या”, असे आवाहन राष्ट्रवादीचे केले.

- Advertisement -

यावेळी बोलतांना शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, पक्षाने अजित पवारांना (Ajit Pawar) तीनदा उपमुख्यमंत्री बनवले. ⁠त्यांनी काम केले माझं काही म्हणणे नाही. ⁠तुम्ही माझी निवड केली, त्यानंतर अजित पवार यांची निवड केली. आता युगेंद्र पवार यांची निवड करा. ⁠त्यांनी प्रत्येक गावात फिरुन माहिती घेतली आहे. प्रश्न समजून घेतलेत. ⁠देशात कोठेही जा, बारामतीचे नाव घेताच लोक आणखी एक नाव घेतात. कोणाचं नाव घेतात, ते म्हणजे शरद पवार. ⁠आमच्यापेक्षा जास्त जोमाने काम करण्याची धमक युगेंद्रमध्ये आहे. त्यामुळे त्यांना साथ द्या, असे आवाहन शरद पवारांनी बारामतीकरांना केले.

पुढे ते म्हणाले की, एकीकडे राज्य सरकार महिलांचा (Women) सन्मान केल्याचे म्हणत आहे, पण दुसरीकडे अत्याचार वाढले आहेत. राज्यातील ६४ हजार मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचा थांगपत्ता लागत नाही. शेतकऱ्यांची स्थिती वाईट आहे. महाराष्ट्रात २० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ⁠शेतीमालाला भाव नाही, कर्जबाजारीपणामुळे या आत्महत्या झाल्या.नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना कर्ज परत फेडीसाठी काही ना काही मदत केली पाहिजे होती. मात्र त्यांनी १६ उद्योजकांचे १८ हजार कोटी रुपयांचे कर्जमाफ केले. मात्र शेतकऱ्यांचं काही हजारांचे कर्जमाफ केले नाही असं म्हणत शरद पवारांनी पंतप्रधान मोदींवर (PM Modi) टीका केली.

तसेच नरेंद्र मोदी हे गुजरातचे नाहीत तर ते देशाचे पंतप्रधान आहेत. याचा त्यांना विसर पडला आहे.अशा लोकांच्या हातात सत्ता द्यायची का? असा सवालही शरद पवार यांनी यावेळी केला.लोकसभेचा निकाल देशाला दाखवून दिले की महाराष्ट्र काय चिज आहे. देशाचा कारभार करायचा असेल तर ४०० खासदारांची गरज नसते. घटनेत बदल करायचा असेल तर ४०० खासदार लागतात. त्यामुळे मोदींचा हेतु काय होता हे स्पष्ट आहे. आम्ही सर्वांनी एकत्र येऊन मोदी साहेबांचा हा हेतू पूर्ण होऊ दिला नाही. मोदींना आवर घालण्यासाठी तुम्ही मदत केली. ⁠बहिणीचा सन्मान करायला माझी हरकत नाही. पण आज बहिणीची अवस्था काय आहे, असेही त्यांनी म्हटले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या