Sunday, September 22, 2024
Homeनगरमहाविकास आघाडीची दिशा आठवडाभरात स्पष्ट

महाविकास आघाडीची दिशा आठवडाभरात स्पष्ट

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

येणारा प्रत्येक दिवस हा महाविकास आघाडीतील प्रत्येक घटक पक्षासाठी महत्वाचा ठरत असून प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघनिहाय महाविकास आघाडीचे नेते आढावा घेतांना दिसत आहेत. मात्र, पुढील आठवड्यात नगरसह राज्यातील महाविकास आघाडीची विधानसभेसाठी दिशा स्पष्ट होणार असून त्याबाबतचे संकेत खुद्द शरद पवार यांनी शनिवारी दिले. शनिवारी सकाळी ते दुपारी उशीरापर्यंत नगर जिल्ह्यातील महाविकास आघाडीसह शरद पवार गटांच्या संभाव्य जागा वाटपाबाबत स्वत: पवार यांनी जिल्ह्यातील निवडक सहकार्‍यांसोबत चर्चा केली. यावेळी दक्षिण नगर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील कार्यकते आणि नेत्यांच्या शिष्टमंडळाने पवार यांची भेट घेतली.

तसेच विधानसभेसाठी तिकीटाची मागणी केली. दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण झालेले नाही. कोणत्या जागेवर लढणार हे निश्चित झाल्यानंतर जागा जाहीर करण्यात येणार आहेत, असे यावेळी पवार यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीच्या सर्वांनी कामाला लागावे, असे आदेश पवार यांनी दिले आहेत. भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गटातून जिल्ह्यातील कोणते नेते आपल्या पक्षात येण्यास इच्छुक आहेत? त्याचा विधानसभा निवडणुकीवर कसा परिणाम होणार, याबाबत शरद पवार यांनी चर्चा केली. राष्ट्रवादीच्या संपर्कात असणार्‍या बड्या नेत्यांच्या नावावर यावेळी चर्चा झाली.

जिल्हा बँकेवर सविस्तर बोलू
नगर जिल्हा बँकेची सहकार विभागाकडून सुरू असणारी चौकशी, भरती प्रक्रिया आणि अन्य बाबींचा विषय सहकारातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे काढण्यात आला. मात्र, यावेळी अन्य नेते मंडळी असल्याने पवार यांनी जिल्हा बँकेच्या विषयावर पुन्हा सविस्तर बोलू असे सांगितले. नगर जिल्हा बँकेच्या आर्थिक परिस्थितीवर यापूर्वी सर्वप्रथम पवार यांनी जाहीर भाष्य केलेले असल्याने त्यांच्यापासून काही लपून नसल्याचे यावेळी सोबत उपस्थित असणार्‍या नेत्यांने ‘सार्वमत’शी बोलतांना स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या