Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवारांचे मविआ एकत्र लढण्याबाबत मोठे विधान

शरद पवारांचे मविआ एकत्र लढण्याबाबत मोठे विधान

मुंबई | Mumbai

- Advertisement -

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यातच राज्यात काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर स्वत: शरद पवार आणि अजित पवारांनी यावर स्पष्टीकरण दिले होते. परंतु, तरी देखील या चर्चा थांबलेल्या नाहीत. अशातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आगामी निवडणुका मविआ म्हणून एकत्र लढण्याबाबत मोठे विधान केले आहे.

शरद पवार कालपासून अमरावतीच्या (Amravati) दौऱ्यावर असून त्यांना २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना ते म्हणाले की, ”आम्ही एकत्र लढणार वैगरेबद्दल बोलायचे झाले, तर आज आमची आघाडी आहे. एकत्र काम करण्याची इच्छा आहे. पण फक्त इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचे वाटप, त्यात काही अडचणी आहेत की नाहीत. त्यामुळे यावर अजून चर्चा झालेली नसल्याने काही सांगता येणार नाही. असे त्यांनी म्हटले आहे.

तसेच पुढे शरद पवारांना २०२४ च्या निवडणुका वंचित बहुजन आघाडीसोबत (Vanchit Bahujan Aghadi) लढणार का? यावर देखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना पवार म्हणाले की, “वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांशी आमची महाराष्ट्रातील आघाडीबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. फक्त कर्नाटक निवडणुकीत काही जागांबाबत त्यांच्याशी चर्चा झाली आहे”, असे शरद पवारांनी यावेळी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या