Friday, May 31, 2024
Homeदेश विदेशशरद पवारांकडून संभ्रम दूर ; बंगळुरुत विरोधी पक्षाच्या बैठकीला उपस्थिती

शरद पवारांकडून संभ्रम दूर ; बंगळुरुत विरोधी पक्षाच्या बैठकीला उपस्थिती

मुंबई | प्रतिनिधी

कर्नाटकची राजधानी बंगरुळूत आयोजित बैठकीत सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी गेल्या काही दिवसांपासून निर्माण झालेला संभ्रम दूर केला. राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) आमदारांचा एक गट भाजपला जाऊन मिळाला असला तरी आपण भाजपासून राजकीय अंतर राखून असल्याचे पवार यांनी आज दाखवून दिले.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे २ जुलैला आपल्या आठ सहकाऱ्यांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मंत्रिमंडळात सहभागी झाले. त्यानंतर शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या अध्यक्षपदावरून हटवून अजित पवार यांनी स्वतःला पक्षाचे अध्यक्ष म्हणून घोषित केले. याशिवाय ५ जुलैला मुंबईतील वांद्रे एजुकेशन ट्रस्टच्या आवारात पक्षाची बैठक घेऊन अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्या कार्यशैलीवर तसेच राजकीय निर्णयांवर जोरदार टीका केली होती.

INDIA vs NDA : ‘इंडियाच्या’ बैठकीतून उध्दव ठाकरेंचा मोदी सरकारवर निशाणा ; म्हणाले, आम्ही आहोत..

मात्र, राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी अनपेक्षितपणे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये जाऊन शरद पवार यांची भेट घेतली होती. अजित पवार गटाने पवार यांचा आशीर्वाद मागितला होता. याशिवाय पक्ष एकसंघ राहावा म्हणून भाजपशी जुळवून घेण्याची विनंती पवार यांना करण्यात आली होती. मात्र, पवार यांनी त्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

अशातच पुन्हा दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि अजितदादा गटाच्या आमदारांनी पवार यांची भेट घेतली होती. या भेटीमुळे महाविकास आघाडीत तसेच शरद पवार यांच्या गटात संभ्रम निर्माण झाला होता. अजितदादा गटाच्या आमदारांना पवार भेटत असल्याने त्यातून निर्माण झालेले संशयाचे वातावरण दूर करण्याची मागणी काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी केली होती. अशातच शरद पवार यांनी काल, सोमवारी बेंगरूळुला जाण्याचे टाळले होते. त्यामुळे संभ्रम आणखी वाढला होता.

UPA नाही तर आता INDIA… विरोधी ऐक्याचे नाव ठरले; काय आहे फुल फॉर्म?

या पार्श्वभूमीवर शरद पवार हे आज सकाळी खासगी विमानाने बंगरूळुला गेले. तेथे ते भाजपविरोधी पक्षाच्या बैठकीत सहभागी झाले. त्यामुळे शरद पवार हे अजित पवार यांच्या गटाला जवळ करणार नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, आज बेंगळूरू येथे विरोध पक्षांच्या बैठकीसाठी उपस्थित राहिलो. यावेळी काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार, माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, सीपीआय नेते सीताराम येचुरी, समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे नेते खा. डेरेक ओ ब्रायन आणि विविध विरोधी पक्षांच्या मान्यवरांसोबत भेटीगाठी झाल्या. यावेळी उपस्थित सर्व नेत्यांकडून एकत्र लढू आणि जिंकू असा निर्धार करण्यात आला, असे ट्विट पवार यांनी केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या