Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याSharad Pawar : "महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने..."; मराठा आरक्षणावर शरद पवारांचे पहिल्यांदाच...

Sharad Pawar : “महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने…”; मराठा आरक्षणावर शरद पवारांचे पहिल्यांदाच भाष्य

मुंबई | Mumbai

मराठा आरक्षणावरून (Maratha Reservation) सध्या राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. मराठा समाजाच्या विविध संघटनांकडून मराठा आरक्षणासाठी ठिकठिकाणी साखळी उपोषण आणि आंदोलने करण्यात येत आहेत. तर अनेक गावांनी राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी केली आहे. त्यामुळे नेत्यांची चांगलीच धांदळ उडतांना दिसत आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मराठा आरक्षणावर पहिल्यांदाच भाष्य केले असून राज्य आणि केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे…

- Advertisement -

CM Eknath Shinde : फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’ व्हिडीओवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, “महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने (Maharashtra and Central Government) एकत्र बसून मराठा समाजाचा प्रश्न सोडवला पाहिजे. सरकार बघ्याची भूमिका घेत आहे का? असा प्रश्न मला पडला आहे. कारण अजून कोणतीच पावलं उचलली जात नाहीत,” असे त्यांनी म्हटले. तसेच यावेळी शरद पवारांना पत्रकारांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) बारामतीतील (Baramati) रद्द झालेल्या दौऱ्यावर प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अजित पवार यांनी माळेगावला जाणं टाळले हे योग्य आहे. वातावरण गरम असताना तिथं न जाणे हेच योग्य आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.

शेतकऱ्यांसाठी काय केलं? PM मोदींच्या टीकेला शरद पवारांचे प्रत्युत्तर, म्हणाले…

पुढे ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी मराठा आरक्षणावर काहीच बोलले नाहीत. कारण त्यांना ज्याची भिती वाटते, ते त्याबाबत बोलले, असे म्हणत शरद पवारांनी मोदींवर निशाणा साधला. तसेच पंतप्रधान मोदींनी नगर जिल्ह्यातील शिर्डी येथील शेतकरी मेळाव्यात बोलताना शरद पवारांनी कृषीमंत्री असताना देशातील शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल केला होता. त्यालाही शरद पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

मनोज जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, “कुणाच्या जीवाला काही झालं तर…”

- Advertisment -

ताज्या बातम्या