Friday, May 17, 2024
Homeमहाराष्ट्र'धर्मावर आरक्षण ही संकल्पना…'; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

‘धर्मावर आरक्षण ही संकल्पना…’; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका

मुंबई | Mumbai
देशात सध्या लोकसभा निवडणुकांचा (Loksabha Elections) रणसंग्राम सुरु असताना राजकीय पक्ष, नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप, टिका, टिप्पणी सुरु आहे. महाराष्ट्रातही सगळेच पक्ष प्रचारात गुंतलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली. कोल्हापूरमध्ये त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

‘मोदींच्या सभा झाल्या पाहिजेत, म्हणून ५ टप्प्यात मतदान होतय’ असे शरद पवार म्हणाले. महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदान घेण्याच कारण काय? असा सवाल शरद पवार यांनी विचारला. भाजपाला महाराष्ट्रातील वातावरणाबाबत चिंता वाटत असावी, असेही ते म्हणाले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भाषणातून मूळ मुद्दे सोडून लोकांना इतर ठिकाणी वळवण्याचा काम करतात” असाही टोला शरद पवारांनी मोदींना लगावला.

- Advertisement -

शरद पवार धर्माच्या आरक्षाबद्दल भुमिका स्पष्ट करताना म्हणाले की, “धर्मावर आरक्षण ही संकल्पना आम्हाला मान्य नाही. हे कुणीही करणार नाही. जर उद्या मोदींनीही असे आरक्षण देऊ केले तरी आम्ही त्या विरोधात उभे राहू. मोदींचे विधान सामाजिक तणाव आणि कटुता वाढविणारे आहे. या रस्त्याने आपल्याला जायचेच नाही.”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

यावेळी शरद पवार पुढे असेही म्हणाले की, “इंडिया आघाडीचे सरकार आले तर ५ वर्षांत ५ पंतप्रधान आणणार हा जावईशोध पंतप्रधान मोदींनी कुठून लावला?” असा सवाल शरद पवारांनी विचारला. स्थानिक मुद्यावरुन भाषण सुरु करणे ही मोदींची स्टाईल आहे असे शरद पवार म्हणाले. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या FRP च्या मुद्यावरही त्यांनी भाष्य केले. “FRP मुळे शेतकऱ्यांना खात्रीशीर भाव मिळतो. FRP ही संकल्पना आम्ही सुरु केली. मोदींना हे माहित नाही. साताऱ्यात मोदींना यशवंतवराव चव्हाणांच्या नावाचा विसर पडला. स्थानिक नेते लिहून देतात, तेवढे मोदी बोलतात” अशी टीकाही शरद पवारांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या