Wednesday, December 4, 2024
Homeमुख्य बातम्याSharad Pawar : "अरे मामा जपून, तुझं सगळं..."; शरद पवारांचा भरणेंना निर्वाणीचा...

Sharad Pawar : “अरे मामा जपून, तुझं सगळं…”; शरद पवारांचा भरणेंना निर्वाणीचा इशारा

मुबंई | Mumbai

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान मंगळवार (दि.७ मे) रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर आज तिसऱ्या टप्प्यात मतदान (Voting) होणाऱ्या मतदारसंघांमधील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. या तिसऱ्या टप्प्यात राज्यातील बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघात देखील मतदान होणार आहे. राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर यंदा पहिल्यांदाच बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यासमोर भावजय सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचे आव्हान आहे. सुळे यांच्यासाठी स्वत शरद पवार तर सुनेत्रा पवारांसाठी अजित पवारांचा बारामतीत सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरु आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर आज इंदापूरमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलतांना शरद पवार यांनी माजी मंत्री आणि अजित पवार गटाचे आमदार दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne)
यांच्यावर जोरदार निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, “इंदापूरमधील (Indapur) काही लोक आम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना सांगण्यात आले की आम्ही तुमच्या शेतातील पाणी बंद करू. शेतीचे पाणी कुणाच्या बापजाद्याची इस्टेट नाही. मी त्यांना एवढचं सांगू शकतो की, अरे मामा जपून, तुझं सगळं काढायला वेळ लागणार नाही. त्यांना मी आमदार (MLA) केलं, मंत्री केलं, ज्यांच्यासाठी भूमिका घेतली त्यांचे पाय आज जमिनीवर नाहीत, हवेत आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करु नका. दमदाटी करत असाल तर १ ते २ दिवसात आम्ही तुम्हाला जागा दाखवून देऊ” असा, निर्वाणीचा इशाराच शरद पवार यांनी भरणे यांना दिला.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, “यंदाची निवडणूक (Election) ही देशाच्या दुष्टीने महत्वाची आहे. देशाची सत्ता भाजपकडे (BJP) आहे. भाजप सत्तेत आल्यानंतर ज्या प्रकारे निर्णय घेतले गेले आहेत त्यामुळे समाजातील एक मोठा वर्ग आज अस्वस्थ आहे. त्यामुळे या सपूर्ण देशाचे राजकारण योग्य ट्रॅकवर कसे आणता येईल, याचा विचार आम्ही करत आहोत. आज केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपची सत्ता नाही. अशी अनेक राज्ये आहेत, ज्याठिकाणी भाजपची सत्ता नाही. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश अशा राज्यात त्यांची सत्ता आहे. इतर कोणत्याही राज्यात त्यांची सत्ता नाही. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणूक होत आहे. त्यामुळे देशाचा कारभार योग्य पद्धतीने करायचा असेल तर भाजपचा पराभव केल्याशिवाय पर्याय नाही”, असे शरद पवार यांनी म्हटले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या