जळगाव | Jalgaon
राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची आज जळगावात (Jalgaon) स्वाभिमान सभा पार पडली. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर सभेला संबोधित करतांना शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) सडकून टीका केली. यावेळी शरद पवारांनी भाजप (BJP) ९ वर्षांपासून सत्तेत असून त्यांनी काय केलं? असा सवाल करत भाजपकडून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप केला…
Shivshakti Parikrama : गळ्यात रुद्राक्षाची माळ, हातात त्रिशूळ…; पंकजा मुंडे बनल्या भोलेभक्त
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, सध्या देशात नरेंद्र मोदींचे राज्य आहे. त्यांना सत्तेत येऊन नऊ वर्षे झाली, या काळात मोदींनी काय केलं? त्यांनी फक्त इतर राजकीय पक्षांना फोडण्याचं काम केलं. त्यांनी शिवसेना (Shivsena) फोडली, राष्ट्रवादी फोडली. त्यांनी फक्त एकच गोष्ट केली, ती म्हणजे फोडाफोडीचं राजकारण. त्याचबरोबर लोकांनी आपल्या हातात दिलेली सत्ता लोकांसाठी वापरण्याऐवजी त्यांनी लोकांवर सीबीआय, ईडीच्या माध्यमातून खोटे खटले दाखल करण्याचे काम केले. याचा उल्लेख अनिल देशमुखांनीही (Anil Deshmukh) केला. काहीही संबंध नसताना आमच्या एका महत्त्वाच्या सहकाऱ्याला काही महिने तुरुंगात टाकायचे काम त्यांनी केले. नवाब मलिकांनाही (Nawab Malik) तुरुंगात टाकले. अनेकांना तुरुंगात टाकले. लोकांनी दिलेली सत्ता लोकांना सन्मानाने जगता येईल, यासाठी वापरण्याऐवजी भाजपने सत्तेचा गैरवापर केला”, अशा शब्दांत शरद पवारांनी टीकास्र सोडले.
Maharashtra Rain Update : राज्यातील ‘या’ भागांत पावसाचा जोर वाढणार; हवामान विभागाचा नेमका अंदाज काय?
पुढे बोलतांना ते म्हणाले की, सर्व देशामध्ये पाणी साठा कमी झाला आहे. शेतकरी (Farmer) अडचणीत आला आहे. जनावरांना, रानामध्ये पाणी नाही. दुहेरी पिकं करुनही फायदा झाला नाही. ही स्थिती बदलायची आहे. राज्यकर्ते यांची इच्छाशक्ती असेल तर परिस्थिती बदलू शकते. पण, सध्याचे जे सरकार आहे, त्यांना शेतकऱ्यांची चिंता नाही. यवतमाळमध्ये (Yavatmal) १५ दिवसांत २० लोकांनी आत्महत्या केली. शेतकरी कष्ट करणारा आणि घाम गाळणारा आहे. पण, त्याची किंमत सरकार करत नाही. नाशिकचा कांदा अडचणीत आहे. त्यामुळे काहीतरी करण्याची आवश्यकता आहे. शेतकरी लाचार नाही, भीक मागत नाही. कष्टाची किंमत मागतो. ते मिळत नसेल तर संघर्ष करावा लागेल, असंही शरद पवार यांनी म्हटले.
मोदी सरकारने ‘इंडिया’चे नाव बदलले?; काँग्रेस नेत्याने ट्वीट करत व्यक्त केला संताप
ते पुढे म्हणाले की, जालन्यात (Jalna) काही कारण नसतांना मराठा आंदोलकांवर (Maratha Protestors) लाठीचार्ज (Lathi Charge) करण्यात आला. त्याचा परिणाम महाराष्ट्रात (Maharashtra) बघायला मिळाला. शेतकरी आणि महिलांवर हल्ला करण्याची प्रवृत्ती ज्यांची असेल त्यांचा पराभव करु, हा निकाल आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे, असे आवाहनही शरद पवारांनी यावेळी उपस्थितांना केले.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Accident News : पुणे-बंगळूरु महामार्गावर भीषण अपघात; कार-ट्रकच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू