Sunday, September 15, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार-देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर; दोघे काय बोलणार? अवघ्या राज्याचे लक्ष

शरद पवार-देवेंद्र फडणवीस आज एकाच मंचावर; दोघे काय बोलणार? अवघ्या राज्याचे लक्ष

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राष्ट्रवादी पक्षाचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यामध्ये काल गुप्तभेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीचं नेमकं कारण काय याबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. या चर्चा सुरु असताना असा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आता आज एकाच मंचावर येणार आहेत.

शेतकरी कामगार पक्षाचे (Shetkari Kamgar Paksh) दिवंगत नेते व सांगोल्याचे आमदार राहिलेले भाई गणपतराव देशमुख (Bhai Ganpatrao Deshmukh) यांच्या स्मारकाचे अनावरण आज होणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सध्या तरी एकमेकांच्या विरोधात असलेले हे नेते एकत्र येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP Crisis) फुटीनंतर शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रथमच दोघेच आमने-सामने दिसणार आहेत. यापूर्वी पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यक्रमात हे दोन्ही नेते एकाच मंचावर होते. मात्र, यावेळी पंतप्रधानांसोबत राज्याचे राज्यपाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अजित पवार वगैरे सर्वचजण उपस्थित असल्याने या शासकीय कार्यक्रमात टोलेबाजी पाहायला मिळाली नव्हती. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात दोघेही काय बोलणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

कोपरगावच्या विधानसभेवर आ. काळे-कोल्हेंचा दावा

अजित पवार-शरद पवार भेट

शनिवारी एका कार्यक्रमानिमित्त शरद पवार आणि अजित पवार दोघेही पुण्यात होते. तेव्हा कोरेगाव पार्क येथील उद्योपती अतुल चोरडिया यांच्या घरी काका-पुतण्यांची भेट झाली. या भेटीबाबत प्रचंड गुप्तता पाळण्यात आली. परंतु माध्यमांना याची माहिती मिळताच ते चोरडियांच्या निवासस्थानाबाहेर जमले. सुरुवातीला शरद पवारांचा ताफा घराबाहेर पडला त्यानंतर पाऊण तासाने अजित पवारांची कार बंगल्याबाहेर पडली. परंतु त्या वाहनात अजित पवार नव्हते. माध्यमांना चकवा देण्यासाठी अजित पवारांनी रिकामी कार बंगल्याबाहेर पाठवली. त्यानंतर दुसऱ्या कारमधून ते मागच्या सीटवर खाली लपून बाहेर पडल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या