Saturday, May 18, 2024
Homeमुख्य बातम्या...म्हणून शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही; नरेंद्र मोदींचं मोठं विधान

…म्हणून शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही; नरेंद्र मोदींचं मोठं विधान

नवी दिल्ली | New Delhi

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची महाराष्ट्रासह (Maharashtra) देशातील राजकारणात अढळस्थान असणारा नेता म्हणून ओळख आहे. शरद पवार गेल्या कित्येक वर्षांपासून देशाच्या राजकारणात सक्रिय आहेत. जेव्हा-जेव्हा देशात लोकसभा निवडणूका (Lok Sabha Elections) होऊन निकाल लागले तेव्हा पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचे नाव अग्रस्थानी राहिले आहे. मात्र, त्यांना पंतप्रधानपदाने अनेकदा हुलकावणी दिली आहे. अशातच आता यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाष्य केले आहे…

- Advertisement -

ज्येष्ठ लेखक, विचारवंत प्रा. हरी नरके यांचं निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) काल महाराष्ट्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीमधील ( एनडीए ) खासदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी “शरद पवारांना काँग्रेसमुळे पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही”, असे विधान केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, “काँग्रेसमधील (Congress) घराणेशाहीच्या राजकारणामुळे शरद पवारांना पंतप्रधान होण्याची संधी मिळाली नाही. तसेच, शरद पवार आणि काँग्रेसने अनेक राजकीय क्षमता असलेल्या नेत्यांना डालवण्यांचे काम केले,असे मोदींनी म्हटले.

School Bus Accident : स्कूल बस उलटली, ८ विद्यार्थी गंभीर जखमी

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, सत्तेत असताना चुकीची कामे करणाऱ्यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला. नंतर निवडणूक प्रचारावेळी या नेत्यांनी केलेल्या चुकांची माफीही मागितली. काँग्रेसप्रमाणे भाजपा अहंकारी नाही. २०२४ होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत एनडीएचा (NDA) विजय होणार,” असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.

अडवाणींना राष्ट्रपती होण्यापासून कोणी रोखले?; संजय राऊतांचा मोदींना थेट सवाल

यावेळी पंतप्रधान मोदींनी शिवसेना-भाजप युती तुटण्यावर देखील भाष्य केले. मोदी म्हणाले की, २०१९ ला उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असलेली युती तोडली. भाजपने ही युती तोडली नाही, असे त्यांनी म्हटले. तसेच काँग्रेसप्रमाणे भाजप अहंकारी नाही. त्यामुळे भाजप सत्तेवरून पायउतार होणार नाही. २०१४ पासून शिवसेना एनडीएसोबत सत्तेत असतानाही ‘सामना’ वृत्तपत्रातून वारंवार टीका केली जात होती. मात्र भाजपने त्यांना प्रतिउत्तर दिले नाही, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या