Monday, October 14, 2024
Homeमुख्य बातम्यादसऱ्याला राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?; शिंदे गटातील बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

दसऱ्याला राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार?; शिंदे गटातील बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

मुंबई | Mumbai

राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मंत्रिमंडळात वर्णी लागावी म्हणून अनेकजण गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. तिन्ही पक्षाचे आमदार मंत्रिपद मिळावं म्हणून लॉबिंग करताना दिसत आहेत. मात्र, या विस्तारापूर्वीच राज्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी मोठं विधान केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात महाभूकंप होण्याची शक्यताच देसाई यांनी वर्तवल्याने खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातील अनेक नेत्यांच्या सरकारसोबत येण्याच्या चर्चा एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत होत आहेत. यामुळेच कदाचित मंत्रीमंडळ विस्ताराला विलंब लागत असावा असा गौफ्यस्फोट शंभुराज देसाई यांनी केलाय. लवकरच तो विस्तार होईल असं सांगत दसरा दिवाळीत नेहमी धमाके होतच असतात मात्र यावेळी मोठा धमाका होईल, असा गौफ्यस्फोट शंभुराज देसाई यांनी केला आहे. यामुळं राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा कोणता बडा नेता शिंदे फडणवीस सरकारसोबत जाणार हे पाहावं लागणार आहे.

दरम्यान शिंदे – फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार गत अनेक महिन्यांपासून लांबला आहे. यामुळे या दोन्ही पक्षांतील इच्छूक अवस्थ झालेत. त्यातच अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे विस्तार का लांबत होता याचे उत्तर मिळाले. पण सत्तेतील वाटा वाढल्यामुळे सत्ताधारी पक्षातील अनेक इच्छूक आमदार अस्वस्थ असल्याचीही चर्चा ऐकावयास मिळत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या