Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याSharad Pawar : "कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात..."; अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची पहिली...

Sharad Pawar : “कुटुंबातील व्यक्तीला भेटण्यात…”; अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

मुंबई | Mumbai

काल पुण्यातील (Pune) कोरेगाव पार्कमध्ये (Koregaon Park) प्रसिद्ध उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची गुप्त भेट झाली होती. या भेटीवरून राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. अशातच आता यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे…

- Advertisement -

शरद पवार हे आज सांगोल्याच्या (Sangola) दौऱ्यावर होते. त्यांच्या उपस्थितीत सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यासह आदी नेते उपस्थित होते. हा कार्यक्रम आटोपल्यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत विविध विषयांवर संवाद साधत अजित पवार यांनी घेतलेल्या भेटीवर भाष्य केले.

Jayant Patil : “ती गुप्त नव्हे तर…”; शरद पवार-अजित पवारांच्या भेटीबाबत जयंत पाटलांचे स्पष्टीकरण

यावेळी ते म्हणाले की, “मला माहिती नाही की तुम्हाला कितपत माहिती आहे, अजित पवार हे माझे पुतणे आहेत. कुटुंबातील व्यक्तीने वडीलमाणसाला भेटण्यात गैर काय? असे शरद पवार यांनी म्हटले. यावेळी पत्रकारांनी पवारांना अजित पवार तुमचे पुतणे आहेत तर मग भेट गुप्त का? असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देतांना शरद पवार म्हणाले की, बैठक गुप्त नव्हती. माझ्या घरी किंवा कुणाच्या घरी भेट झाली तर त्यात वावगं काय? यावर पत्रकारांनी लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाल्याचे सांगितले. त्यावर पवार म्हणाले याचा अर्थ तुम्हाला उद्योग नाहीत. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये एकच हशा पिकल्याचे पाहायला मिळाले.

Nashik News : संभाजी स्टेडियमचे काम पूर्ण होण्यासाठी नगरसेविकेने दिला बोकड बळी

पुढे बोलतांना पवार म्हणाले की, आमच्यातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली हे खरं आहे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपसोबत (BJP) जाणार नाही. इंडिया आघाडीची बैठक ३१ तारखेला मुंबईतील हयात हॉटेलमध्ये होणार आहे. ३० ते ४० वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते येणार आहेत. मी, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांनी ही बैठक आयोजित केली आहे. आम्हाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. फोडाफोडी, सत्तेचा गैरवापर लोकांना आवडत नाही. त्यामुळे भाजपला नुकसान सहन करावे लागेल. अविश्वास ठरावाला (Motion of No Confidence) उत्तर देतांना देशाच्या पंतप्रधानांनी मणिपूर प्रकरणाचा अत्यल्प उल्लेख केला. त्यांनी राजकीय हल्ले जास्त केले, हे योग्य नाही. मात्र, इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये देशाच्या हितासंबंधी चर्चा होत आहे, असेही शरद पवारांनी म्हटले.

Devendra Fadnavis : “या भेटीबाबत मला…”; शरद पवार-अजित पवारांच्या गुप्त भेटीवर फडणवीस स्पष्टच बोलले

तसेच भाजपाबरोबर युती करण्याच्या चर्चेवर बोलतांना शरद पवार म्हणाले की, “भाजपाबरोबर युती करणे, हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय धोरणामध्ये बसत नाही. त्यामुळे आम्ही कुणीही भाजपाबरोबर जाणार नाही. भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे. माझ्या मते सामान्य लोकांना ते मान्य नाही. त्यामुळे जेव्हा मत देण्याची वेळ येईल, त्यावेळी सामान्य लोकांकडून त्यांना सहन केले जाणार नाही. तसेच केंद्र सरकारकडून ईडीचा वापर विरोधकांना दाबण्यासाठी करण्यात येत असून महाराष्ट्रातील सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस, कॉंग्रेस आणि ठाकरे गट या तीन पक्षांच्या हाती जनता देईल, असे शरद पवार म्हणाले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस कधी बरसणार? हवामान विभागाने दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

- Advertisment -

ताज्या बातम्या