नवी दिल्ली | New Delhi
गेल्यावर्षी शिवसेनेत (Shivsena) तर काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) पडलेल्या फुटीमुळी दोन्ही पक्षांत गट पडले होते. त्यांनतर दोन्ही गटांकडून निवडणूक आयोगात (Election Commission) पक्षाच्या चिन्हावर दावा करण्यात आला होता. यानंतर एकनाथ शिंदेंना निवडणूक आयोगाकडून शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह देण्यात आले होते. तर राष्ट्रवादीच्या पक्ष चिन्हाबाबत निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरु असून दोन्ही गटांकडून पक्षावर दावा करण्यात आला आहे. याप्रकरणी आज निवडणूक आयोगात सुनावणी पार पडली…
Reservation News : बिहारमध्ये आता ६५ टक्के आरक्षण; कोणत्या प्रवर्गाला किती टक्के वाटा?
यावेळी शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Group) अॅड. अभिषेक मनु सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांनी जोरदार बाजू मांडत अजित पवार गटावर आरोप करतांना मृत व्यक्तींच्या नावेही प्रतिज्ञापत्रे सादर केल्याचा दावा केला.ते म्हणाले की, निवडणूक आयोगात आज दीड तास सुनावणी झाली. या सुनावणीत आमच्याकडून युक्तीवाद सुरू झाला. आम्ही खूप चमत्कारीत तथ्य निवडणूक आयोगासमोर ठेवले. जे दस्तावेज याचिकाकर्त्यांनी (Petitioners) निवडणूक आयोगात दाखल केले होते. त्यापैकी २० हजार प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्या आहेत. तर ८ हजार ९०० प्रतिज्ञापत्रांची चार्ट बनवून निवडणूक आयोगात सादर केले आहेत. यामध्ये भ्रष्ट, विकृत पद्धतीने दस्तावेज आणि प्रतिज्ञापत्रात त्रुटी आढळल्या असून मृत व्यक्तींचेही प्रतिज्ञापत्र यात असल्याचा दावा सिंघवी यांनी केला.
Sushma Andhare : “उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची…”; ‘तो’ व्हिडिओ ट्विट करत सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
पुढे ते म्हणाले की, अजित पवार गटाकडून अल्पवयीन मुलांचेही प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करण्यात आले आहे. एनसीपीच्या संविधानात नसलेले पदेही दाखवण्यात आले आहे. गृहिणी, झोमॅटोचा सेल्समन दाखवून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. याप्रकारे २४ कॅटगिरी बनवल्या आहेत. यामार्फत आम्ही स्पष्ट केले की हे चुकीच्या पद्धतीने प्रतिज्ञापत्र बनवण्यात आले आहे. याचा अर्थ अजित पवार गटाकडे कोणतेही समर्थन नाही. आता पुढची सुनावणी २० नोव्हेंबरला होणार आहे. त्यामुळे बनावट प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी अजित पवार गटावर कारवाई करण्याची आम्ही मागणी करणार आहोत. चुकीची विधाने, चुकीचे प्रतिज्ञापत्र दिल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी अभिषेक मनु सिंघवी यांच्याकडून करण्यात आली.
‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांचा १५ नोव्हेंबरपासून पुन्हा महाराष्ट्र दौरा; ‘असे’ आहे नियोजन