Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल; अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात मोठा...

शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगात उत्तर दाखल; अजित पवार गटाच्या आमदारांविरोधात मोठा निर्णय

मुंबई | Mumbai

अजित पवार (Ajit Pawar) यांनी बंड केल्यानंतर थेट राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि चिन्हावर दावा केल्यानंतर शरद पवार आक्रमक झाले आहेत. मंत्र्यासोबत अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांविरोधातही शरद पवार (Sharad Pawar Group) गटाने अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.

- Advertisement -

९ मंत्र्यासोबत ३१ आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका दाखल करण्यात आली आहे. यातील विधानपरिषदेचे आमदार असल्याची माहिती आहे. आता शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई आता निवडणूक आयोगासमोर सुरू होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. अजित पवारांनी २ जुलैला बंड केल्यानंतर दोन महिन्यानंतर शरद पवार गटाने निवडणूक आयोगाला उत्तर दिले आहे. अजित पवार गटाला देखील आजच उत्तर दाखल करायचे आहे. मात्र अद्याप त्या संदर्भात कोणतीही माहिती मिळालेली नाही.

जागतिक बँकेकडून पंतप्रधानांचे कौतुक; म्हणाले ५० वर्षांचं काम…

राष्ट्रवादी काँग्रेसमधील लढाई ही अगदी शिवसेनेसारखीच होताना दिसत आहे. कारण शिवसनेच्या सुनावणीवेळी देखील असेच दावे करण्यात आले होते. अजित पवार यांच्या गटाकडे ४० आमदारांचा पाठिंबा आहे. यातील प्रत्येक आमदार हा लाखो नागरिकांचे प्रतिनिधित्व करतो. त्यामुळे बहुमत आमच्या बाजूने आहे.

त्यामुळे पक्षाचे चिन्ह आणि नाव आमच्याकडेच असायला हवे, अशी स्पष्ट भूमिका अजित पवार यांची आहे. अशीच भूमिका शिवसेनेच्या सुनावणीवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची होती. विशेष म्हणजे त्यांचाच गटाला पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले होते. निवडणूक आयोगाने अद्याप पक्षातल्या फुटीची केस म्हणून नोंद घेतलेली नाही. दोन्ही बाजूची उत्तर ऐकल्यानंतर आयोग किती वेगाने सुनावणी करणार याची उत्सुकता आहे.

नाशिकमध्ये धो-धो; गंगापूरमधून विसर्ग वाढवला, ‘या’ धरणांमधूनही सोडले पाणी

अजित पवार गटालाही उत्तर देण्याची आजची तारीख देण्यात आलेली आहे. दरम्यान शरद पवार गटाकडून काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे दिली असल्याची माहिती समोर आली आहे. पहिल्यांदाच आमदारांचा आकडा समोर आला आहे. ९ मंत्र्यांच्या अपात्रतेच्या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली होती. मात्र आता ३१ आमदारांच्या अपात्रतेची याचिका दाखल केली आहे.

तर अजित पवार गटाकडून करण्यात आलेले सर्व दावे शरद पवार गटाने फेटाळले आहे. अजित पवारांनी आपण राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचा, पक्ष आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला होता तो शरद पवार गटाने फेटाळला आहे. २०२२ मध्ये पक्षाची राष्ट्रीय कार्यकारिणी झाली होती त्याची देखील काही पुरावे देण्यात आल्याची माहिती आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या