Sunday, June 23, 2024
Homeमुख्य बातम्याNCP Crisis : "दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र..."; अजित पवारांच्या पत्राला शरद पवार...

NCP Crisis : “दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र…”; अजित पवारांच्या पत्राला शरद पवार गटाकडून जोरदार उत्तर

मुंबई | Mumbai

- Advertisement -

काही माहिन्यांपूर्वी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह राष्ट्रवादीच्या (NCP) ९ आमदारांनी (MLA) शिंदे-फडणवीस सरकारला (Shinde-Fadnavis Government) पाठिंबा देत मंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला होता. त्यानंतर काल अजित पवारांच्या नेतृत्वाखालील गटाला सत्तेत सहभागी होऊन १०० दिवस पूर्ण झाले. त्यानिमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक पत्र लिहून आपण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी का झालो? याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती. यानंतर आता अजित पवारांच्या या पत्राला प्रत्युत्तर देत शरद पवार गटाने (Sharad Pawar Group) “१०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण, असे म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे…

Sushma Andhare : “ड्रग्ज माफिया ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी दादा भुसेंचा फोन”; ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप

शरद पवार गटाने १०० दिवसांत काय-काय झालं अशी सविस्तर पोस्ट एक्स (ट्वीट) वर शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये शरद पवार गटाने म्हटले आहे की, “१०० दिवस छत्रपती-फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे, १०० दिवस मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू आणण्याचे, १०० दिवस वारकऱ्यांवर, मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या नतद्रष्ट्यांसोबतचे, १०० दिवस रुग्णालयांतील मृत्यूकांडास जबाबदार असंवेदनशील सरकारसोबतचे, १०० दिवस महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार, प्रकल्प हिरावून घेणाऱ्या महाराष्ट्र विरोधकांसोबतचे, १०० दिवस माताभगिनींवर अन्याय करणाऱ्या वृत्तीसोबत राज्यकारभार करण्याचे, १०० दिवस मराठा, ओबीसी, धनगर, लिंगायत, समाजाचे आरक्षण रखडवणाऱ्या आरक्षणाविरोधकांसोबतचे, १०० दिवस मराठी अस्मितेची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्र द्रोह्यांसोबतचे, १०० दिवसांचं कर्तुत्व सांगावं लागणं यातच तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येत आहे”, असे या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

Dada Bhuse : सुषमा अंधारेंच्या ‘त्या’ आरोपांवर मंत्री दादा भुसेंचे स्पष्टीकरण; म्हणाले, आरोप…

तसेच पुढे या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही. जो तुम्ही गेले १०० दिवस गहाण ठेवलात. कितीही मोठं संकट आलं तरी विचारांच्या तत्वांशी एकनिष्ठ राहून कुणापुढे न झुकता महाराष्ट्राच्या हिताचा ध्यास अहोरात्र बाळगण्याची धमक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतृत्त्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांमध्येच आहे”, असेही शरद पवार गटाने पोस्टमध्ये (Post) म्हटले आहे.

ICC World Cup 2023 : भारत-अफगाणिस्तान आज भिडणार, कोण मारणार बाजी?

दरम्यान, काल अजित पवार गटाने शिंदे-फडणवीस यांच्या युतीच्या सरकारमध्ये सत्तेत जाऊन १०० दिवस पूर्ण झाल्याच्या निमित्ताने लिहिलेल्या पत्रात म्हटले होते की, “आज १० ऑक्टोबर असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मी पत्राद्वारे आपल्याशी संवाद साधत आहे. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात याआधीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका घेतली. असे निर्णय त्या त्या वेळच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीनुसार नेत्यांना घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील झाला”, असे त्यांनी पत्रात लिहले होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Uddhav Thackeray : शिंदेंच्या शिवसेनेने शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळाव्यासाठी अर्ज मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

- Advertisment -

ताज्या बातम्या