Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयSharad Pawar : चष्मा काढला अन् डोळे पुसले; भरसभेत शरद पवारांकडून अजित...

Sharad Pawar : चष्मा काढला अन् डोळे पुसले; भरसभेत शरद पवारांकडून अजित पवारांची नक्कल

बारामती । Baramati

बारामती विधानसभेचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार युगेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित एका सभेत बोलत असताना ज्येष्ठ नेते व या पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नक्कल करत त्यांना चिमटा काढला आहे. ही नक्कल पाहून जबरदस्त हश्या पिकला.

- Advertisement -

अजित पवार यांची काल बारामतीमध्ये सभा झाली होती. त्यावेळी पवार घराण्यातील फुटीबाबत बोलताना अजित पवार भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. शरद पवार यांनी आज बारामतीमधील सभेत अजित पवार यांच्या रडण्याची नक्कल केली. शरद पवारांच्या या कृतीनंतर उपस्थित कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शरद पवार यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीवरही पहिल्यांदाच उघड भाष्य केलं. आम्ही लोकांनी पक्ष काढला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अनेक लोक निवडून आले.राज्य आलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मी काढला. माझ्या आयुष्यात मी कोर्टात उभा राहिलो नव्हतो.

काही लोकांनी आमच्यावर खटला केला. हा पक्ष ही खुण त्यांची नाही, आमची आहे. कोर्टाने मला एक समन्स काढलं. मी कोर्टात गेलो उभा राहिलो. तक्रार माझ्याविरोधात होती, माझ्या आयुष्यात कधी असं घडलं नव्हतं, असं म्हणत शरद पवारांना नाराजी व्यक्त केली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...