Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजशरद पवारांचा छगन भुजबळांविरुद्ध उमेदवार ठरला? 'या' नेत्याने घेतली जयंत पाटलांची भेट

शरद पवारांचा छगन भुजबळांविरुद्ध उमेदवार ठरला? ‘या’ नेत्याने घेतली जयंत पाटलांची भेट

मुंबई | Mumbai

आगामी विधानसभा निवडणुका (Vidhansabha Election) अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरु असून इच्छुक उमेदवार राजकीय पक्षांकडे उमेदवारीसाठी फिल्डिंग लावतांना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज येवला मतदारसंघातून (Yeola Constituency) मंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात उमेदवारीची मागणी करण्यासाठी माजी आमदारांच्या पुत्राने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभेचे बिगुल कधी वाजणार? समोर आली ‘ही’ तारीख

YouTube video player

मिळालेल्या माहितीनुसार, माजी आमदार नरेंद्र दराडे (Narendra Darade) यांचे चिरंजीव आणि शिंदेच्या शिवसेनेचे आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांचे पुतणे कुणाल दराडे (Kunal Darade) यांनी आज बुधवार (दि.०२) रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये तब्बल वीस मिनिटे चर्चा झाली असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट असल्याचे बोलले जात आहे. याआधी देखील एकदा दराडे कुटुंबियांनी जयंत पाटील यांची भेट घेतली होती.

हे देखील वाचा : Raj Thackeray : महात्मा गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरेंनी वाचाळवीरांना फटकारले; म्हणाले, “कितीही बेताल…”

दरम्यान, महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aagahdi) जागावाटपात येवला विधानसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे राहिल्यास कुणाल दराडे तुतारी हातात घेण्याची दाट शक्यता आहे. तर दुसरीकडे महायुतीकडून भाजपच्या नेत्या अमृता पवार (Amruta Pawar) याही येवल्यातून छगन भुजबळांविरोधात जोरदार तयारी करत आहे. काही महिन्यांपूर्वी सहकारमहर्षी (कै) मालोजीराव मोगल यांच्या स्मृतिदिनानिमित्त शरद पवार यांच्या उपस्थितीत येवल्यात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला भाजपामध्ये (BJP) असलेल्या अमृता पवार यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे आता शरद पवार येवल्यातून भुजबळांविरोधात कुणाला उभे करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : “फक्त एक मत मला द्या, उरलेली...

0
नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik आगामी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) पार्श्वभूमीवर नवीन नाशकात (Nashik) प्रचाराला वेग आला असतानाच, काही इच्छुक उमेदवारांनी (Candidate) निवडलेली...