Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजPolitical Special : राष्ट्रवादीच्या प्रचाराचे रणशिंग; शिवस्वराज्य यात्रेवेळी इच्छुकांची भाऊगर्दी

Political Special : राष्ट्रवादीच्या प्रचाराचे रणशिंग; शिवस्वराज्य यात्रेवेळी इच्छुकांची भाऊगर्दी

नाशिक | निशिकांत पाटील

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) इंडिया आघाडीला केंद्रात सत्ता स्थापन करता आली नाही. मात्र भाजपला ‘४०० पार’च्या लक्ष्यापासून रोखण्यात राज्यात इंडिया आघाडीचा भाग असलेल्या महाविकास आघाडीला (Mahavikas Aaghadi) चांगले यश मिळाले. येत्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने (NCP Sharad Pawar) शिवस्वराज्य यात्रेतून प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे. त्याचा प्रत्यय नाशकात आला. महाविकास आघाडीकडून कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाला सुटेल ते अद्याप निश्चित झालेले नाही. तरीसुद्धा आघाडीतील सर्वच पक्ष विशिष्ट जागा आपल्याला सुटावी म्हणून प्रयत्नशील आहेत.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! संजय राऊतांना मोठा झटका; ‘या’ खटल्यात १५ दिवसांच्या तुरुंगवासाची शिक्षा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून नाशिक पश्चिममध्ये जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर व नाशिक मध्यमधून वसंत गिते यांच्या नावाचा पक्षांतर्गत ठराव सर्वानुमते पास करण्यात आला आहे. नाशिक पश्चिममधून महाविक स आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून माजी आमदार नितीन भोसले, माजी नगरसेवक नाना महाले तर काँग्रेसकडून महिला जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, कालिका संस्थानचे अध्यक्ष केशव पाटील, विजय पाटील, लक्ष्मण जायभावे इच्छुकांच्या यादीत आहेत.

हे देखील वाचा : मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुणे दौरा रद्द; ‘हे’ आहे कारण

नाशिक मध्यमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शहर जिल्हाध्यक्ष गजानन शेलार, गोकुळ पिंगळे, काँग्रेसकडून माजी नगरसेविका डॉ. हेमलता पाटील, माजी नगरसेवक राहुल दिवे, काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग शहराध्यक्ष हनीफ बशीर तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून महापालिका माजी स्थायी समिती सभापती संजय चव्हाण यांच्यासह अनेक इच्छुक आहेत.

हे देखील वाचा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ – खा.कोल्हे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) व खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिवस्वराज्य यात्रेनिमित्ताने सत्ताधाऱ्यांवर तोफ डागून विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) प्रचाराची सुरूवात केल्याचे दिसून आले. यावेळी इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करीत पाटलांसमोर आपल्या नेत्याच्या नावाने घोषणाबाजी केली. इच्छुकांची गर्दी जास्त असल्याने पाटलांनी सर्वांनाच विश्वासात घेऊन पक्षाचे काम करण्याचे आवाहन केले.

हे देखील वाचा : Sinnar : तुतारीला निवडून आणण्याची जबाबदारी खा.वाजेंची- आ.जयंत पाटील

कोणता करिष्मा घडणार?

शरद पवार यांनी साताऱ्यातील प्रचारसभेवेळी अचानक आलेल्या पावसात भिजत भाषण केले होते. त्याचा परिणाम प्रतिस्पर्धी मातब्बर नेत्याला पराभूत करून राष्ट्रवादीचा उमेदवार निवडून आला होता. पवार यांचा पावसात भिजण्याचा करिष्मा त्यावेळी चालला होता. यावेळी कोणता करिष्मा घडतो त्याची उत्सुकता कार्यकर्त्यांसह मतदारांना लागली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या