Tuesday, March 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूज"शिंदेंच्या शिवसेनेचा अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न"; जयंत पाटलांचे मोठे...

“शिंदेंच्या शिवसेनेचा अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न”; जयंत पाटलांचे मोठे विधान

मुंबई | Mumbai

महायुतीमधील (Mahayuti) शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगावच्या एका कार्यक्रमात बोलताना अर्थ खात्यावर नाराजी व्यक्त केली होती. ‘अर्थ खात हे सर्वात नालायक खातं आहे, दहा वेळा मी पाठवलेली फाईल परत यायची मात्र मी पण पाठपुरावा सोडला नाही’, अशा शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त करत अर्थमंत्री अजित पवार यांच्याविरोधात संताप व्यक्त केला होता.

- Advertisement -

हे देखील वाचा : Weather Update : आज राज्यात मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी

त्यावर बोलतांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार (Sharad Pawar NCP) गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी अजितदादांच्या खात्याला नालायक म्हणणे हे अतिशय धक्कादायक आहे. अजित पवारांना (Ajit Pawar) महायुतीतून बाहेर काढण्यासाठी शिंदे गटाचे प्रयत्न सुरु आहेत, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

हे देखील वाचा : “राज्यात महाविकास आघाडीचं सरकार यावं”; भाजपच्या वाटेवरील ‘या’ बड्या नेत्याचं गणरायाला साकडं

यावेळी बोलतांना जयंत पाटील म्हणाले की, “शिंदे गट (Shinde Group) अजित पवारांच्या राष्ट्रवादीला (NCP) बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहे. अजित पवार यांना सत्तेबाहेर काढल्यास भाजपासोबत युती करताना अधिक जागा मिळतील, असा त्यांचा प्लॅन आहे. एकूणच त्यांच्या या कृतीने सरकार कसं सुरू आहे हे स्पष्ट होतं, असे त्यांनी म्हटले. तसेच गुलाबराव पाटील यांनी अशी टीका करणे योग्य नाही. पण अशी टीका करुन महायुतीमधून अजित पवार यांना बाहेर काढून शिवसेनेला जास्त जागा महायुतीत मिळाव्या असा काही त्यांचा प्लान असेल”, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.

हे देखील वाचा : मोठी बातमी! केंद्र सरकारचा पूजा खेडकरला दणका; प्रशासकीय सेवेतून केले बडतर्फ

लाडकी बहीणवरून सरकारवर निशाणा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरून सरकारमधील तिन्ही पक्ष जाहीरात करताना दिसत आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाने तर गुलाबी कॅम्पेन सुरु केले आहे. त्यावरही जयंत पाटलांनी भाष्य केले. ते म्हणाले की, एजेन्सी त्यांना काय काय करायला लावेल माहिती नाही. सरकारी योजना मीच काढल्यावरून तीन पक्षांमध्ये स्पर्धा सुरु आहे. माझे त्यांचे अलिकडे बोलणं झाले नाही. त्यांना पश्चाताप झाला आहे का माहिती नाही, असे जयंत पाटलांनी म्हटले .

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...