Monday, October 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजशरद पवारांच्या राष्ट्र्वादीच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर; कोण कुठून लढणार?

शरद पवारांच्या राष्ट्र्वादीच्या उमेदवारांची संभाव्य यादी समोर; कोण कुठून लढणार?

मुंबई | Mumbai

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) महायुतीमधील घटक पक्ष असणाऱ्या भाजपने काल (दि.२०) रविवारी ९९ उमेदवारांची (Candidate) यादी जाहीर केली. त्यानंतर आज सोमवारी (दि.२१) रोजी अजित पवार गटाची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीत अजूनही जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यामुळे यादी जाहीर होण्यास उशीर होत आहे. अशातच आता मविआतील शरद पवार गटाची ३८ उमेदवारांची संभाव्य यादी समोर आली आहे.

- Advertisement -

हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपची पहिली यादी जाहीर; ‘यांना’ मिळाली संधी

मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या (Sharad Pawar NCP) संभाव्य यादीत ११ विद्यमान आमदारांना पुन्हा संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर तासगावमध्ये मतदारसंघातून दिवंगत नेते आर. आर. पाटील यांच्या पत्नी सुमनताई पाटील यांच्याऐवजी मुलगा रोहित पाटील (Rohit Patil) यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवारांच्या यादीमध्ये अनेक माजी आमदारांचाही समावेश असल्याचे समजते.

हे देखील वाचा : Political Special : दिंडोरी-पेठ मतदारसंघात पक्षापेक्षा गटा-तटाकडे निवडणुकीची वाटचाल?

दरम्यान, शरद पवार गटाकडून या संभाव्य उमेदवारांना तयारीत राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच कोणत्याही क्षणी अधिकृत उमेदवारी यादी जाहीर होऊ शकते. त्यामुळे आता या यादीत कुणाला उमेदवारी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) हे २४ ॲाक्टोबरला इस्लामपूरमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे बोलले जात आहे.

हे देखील वाचा : Political Special : कळवण-सुरगाणा मतदारसंघात आमदार पवार-गावितांमध्येच मुख्य लढत

शरद पवारांच्या पक्षाची संभाव्य उमेदवारांची यादी

  1. जयंतराव पाटील – इस्लामपूर
  2. डॉ. जितेंद्र आव्हाड – कळवा-मुंब्रा
  3. अनिल देशमुख – काटोल
  4. राजेश टोपे – घनसावंगी
  5. बाळासाहेब पाटील – कराड ऊत्तर
  6. रोहित पवार – कर्जत जामखेड
  7. प्राजक्त तनपुरे – राहुरी
  8. रोहित पाटील – तासगाव-कवठे महांकाळ
  9. सुनील भुसारा – विक्रमगड
  10. अशोक पवार – शिरूर
  11. मानसिंग नाईक – शिराळा
  12. शशिकांत शिंदे – कोरेगाव
  13. संदीप क्षीरसागर किंवा ज्योती मेटे – बीड
  14. हर्षवर्धन पाटील – इंदापूर
  15. राखीताई जाधव – घाटकोपर पूर्व
  16. राजेंद्र शिंगणे – सिंदखेड राजा
  17. युगेंद्र पवार – बारामती
  18. समरजीत घाटगे – कागल
  19. राणी लंके – पारनेर
  20. रोहिणीताई खडसे – मुक्ताईनगर
  21. प्रभाकर देशमुख – माण खटाव
  22. दिलीप खोडपे – जामनेर
  23. राजीव देशमुख – चाळीसगाव
  24. अमित भांगरे – अकोले
  25. प्रतापराव ढाकणे – पाथर्डी
  26. दिपीकाताई चव्हाण – बागलाण
  27. प्रशांत जगताप – हडपसर
  28. सचिन दोडके – खडकवासला
  29. देवदत्त निकम – आंबेगाव
  30. उत्तमराव जानकर – माळशिरस
  31. नंदाताई कुपेकर- बाभूळकर – चंदगड
  32. पृथ्वीराज साठे/ अंजली घाडगे – केज विधानसभा
  33. भाग्यश्री आत्राम – अहेरी
    34.गुलाबराव देवकर आप्पा – जळगाव शहर
  34. प्रदीप नाईक जाधव – किनवट
  35. जयप्रकाश दांडेगावकर – वसमत
  36. बाबजानी दुराणी – पाथरी
  37. विजय भाबंळे – जिंतूर
  38. चंद्रकांत दानवे – भोकरदन

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या