जालना | Jalna
मनोज जरांगे पाटील यांनी १७ सप्टेंबरपासून उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्यांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत असून, मंगळवारी (२४ सप्टेंबर) आमदार राजेश टोपे यांनी त्यांची भेट घेतली.
मंगळवारी रात्री १२ च्या सुमारास राजेश टोपे यांनी आंदोलनस्थळी जाऊन मनोज जरांगे यांच्या तब्येतीची त्यांच्या सहकाऱ्यांची चौकशी केली होती. त्यांनी मनोज जरांगे यांना उपचार घेण्याची विनंती केली. राजेश टोपे गेल्यानंतर मनोज जरांगे यांची प्रकृती फारच खालावत असल्याने आंदोलकांनी सहकाऱ्यांच्या विनंतीवरून मनोज जरांगे यांनी मध्यरात्री वैद्यकीय उपचार घेतल्याचे समजते.
हे ही वाचा : अक्षय शिंदेच्या मृत्यूचे कारण काय?, पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
१७ सप्टेंबरपासून उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे यांचा उपोषणाचा नववा दिवस आहे. काही दिवसांपूर्वीच संभाजीराजे छत्रपती यांनी उपोषणस्थळी भेट देऊन मनोज जरांगे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती वेगाने खालावत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काय पावले उचलणार, हे पाहावे लागेल.
दरम्यान अंतरवाली सराटीत जरांगे पाटील यांची तब्येत घसरल्याने महिलांसह आबालवृद्ध भावुक झाले आहेत. जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यासाठी महिलांनी त्यांना विनंती केली. त्यांनी यावेळी आक्रोश केला. महिलांना अश्रुधारा आवरता आल्या नाही. जरांगे पाटील यांनी पाणी प्यावे अशी विनंती त्यांना करण्यात आली. यावेळी काही महिला मंचावर आल्या. त्यांनी जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली. तर खालून पण मोठ्या संख्येने आंदोलकांनी जरांगे पाटील यांना पाणी पिण्याची विनंती केली.
हे ही वाचा : अक्षय शिंदे एन्काऊंटरवरून आव्हाडांना वेगळीच शंका