मुंबई | Mumbai
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडली. सूत्रांकडून मिळालेल्या माहिती या बैठकीमध्ये मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी असलेल्या उमेदवारांनांच संधी द्या, ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार मिळणार नाही, केवळ त्याच ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या इच्छुकाला संधी द्या, अशा स्पष्ट सूचना या कोअर कमिटीच्या बैठकीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षातील आमदार, खासदारांना दिल्या आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची वाय बी चव्हाण सेंटर येथे बैठक पार पडली. या बैठकीला पक्षाचे खासदार, आमदार उपस्थित होते. शरद पवारांनी कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत जायचे नाही अशा सूचना शरद पवार यांनी दिल्या आहेत. ज्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आघाडी करण्याचा मार्ग या निमित्ताने मोकळा झाला आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवार असतील त्यांना प्राधान्य द्यावे. मूळ ओबीसी प्रमाणपत्र धारक उमेदवार मिळत नसेल तर त्या ठिकाणी कुणबी प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना उमेदवारी द्यावी,अशा प्रकारच्या सूचना शरद पवार यांनी दिली आहे. ज्या ठिकाणी ओबीसी प्रवर्गाचे आरक्षण पडले आहे, तिथे मूळ ओबीसींना उमेदवारी द्यावी. मूळ ओबीसींना कुठेही दुखवू नका अशा सूचना देण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये देखील राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला होता, तो म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्तीत जास्त तरुण आणि नव्या उमेदवारांना संधी द्यायची. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या या रणनितीचा आता पक्षात किती फायदा होणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




