Wednesday, October 9, 2024
Homeमुख्य बातम्याशरद पवार आणि गौतम अदाणी यांच्या भेटीबद्दल राहुल गांधी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले...

शरद पवार आणि गौतम अदाणी यांच्या भेटीबद्दल राहुल गांधी पहिल्यांदाच बोलले; म्हणाले…

दिल्ली | Delhi

काही दिवसांपूर्वीच केंद्रीय निवडणूक आयोगानं पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. पुढील महिन्यात या निवडणुकांसाठी मतदान होणार असून त्याअनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांमध्ये चढाओढ असणार आहे. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांची सरकारं असल्यामुळे तिथेही तिरंगी लढती होण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असतानाच काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi On Sharad Pawar) यांनी आज (18 ऑक्टोबर) पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत उद्योगपती गौतम अदाणी ( Rahul Gandhi On Gautam Adani) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार प्रहार केला. दरम्यान, इंडिया आघाडीतील घटकपक्ष आणि देशातील बडे नेते शरद पवार यांचे अदाणी यांच्यासबत असलेले संबंध भेटीगाठी यांबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नालाही राहुल यांनी रोखठोक प्रत्युत्तर दिले. अदानी आणि पवार यांच्यातील संबंधांबाबत विचारले असता गांधी म्हणाले, सध्या देशाचे पंतप्रधान शरद पवार नाहीत नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे अदाणी मुद्द्यावरुन मी त्यांना नव्हे तर पंतप्रधान मोदी यांना प्रश्न विचारतो.

Samruddhi Mahamarg Accident : ‘समृद्धी’वरील १२ जणांच्या मृत्यूला RTO जबाबदार; भर रस्त्यात ट्रक थांबवल्याचा VIDEO समोर
चर्चा तर होणारच! अजित दादांच्या बॅनरवर झळकला शरद पवार आणि सुप्रिया सुळेंचा फोटो

राहुल गांधी पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, पंतप्रधान पदावर असलेले नरेंद्र मोदी हेच खरे मिष्टर अदानी आहेत. शरद पवार हे देशाचे पंतप्रधान अथवा कोणतेही मंत्री नाहीत. त्यामुळे मी त्यांना प्रश्न विचारत नाही. जर ते सरकारमध्ये महत्त्वाच्या पदावर असते तर मी त्यांना नक्कीच प्रश्न विचारला असता, असे ते म्हणाले. देशाच्या गरीब जनतेच्या खिशातून पैसा काढायचा आणि तो बळकावयचे धंदे सध्या सुरु आहेत. फायनान्शिअल टाइम्सचा हवाला देत राहुल यांन हल्ला चढवत म्हटले की, अदानी इंडोनेशियामध्ये कोळसा विकत घेतात आणि तो भारतात येईपर्यंत त्याची किंमत दुप्पट होते. आमच्या विजेच्या किमती वाढत आहेत. कारण हे सर्व प्रकल्प अदानींचा कोळसा खरेदी करतात. ज्यामुळे वीजेचे दर वाढतात. इतकेच नव्हे तर ही विज वापरणारे लोक गरीब असतात. त्यांना वीजेचे दर का वढतात हे लक्षातही येत नाही. ही सरळ सरळ चोरी आहे.

मोठी दुर्घटना! नगर-आष्टी रेल्वेला भीषण आग

देशातील जनतेच्या खिशातून होणाऱ्या चोरीतून पैसे थेट अदानींच्या खिशात जातात. देशातील जनता जेव्हा घरात विजेचे बटन दाबते तेव्हा त्याचे पैसे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष अदानींच्या खिशात जातात. ही चोरी जनतेच्या खिशातून होत आहे. वेगवेगळ्या देशांमध्ये चौकशी होत आहे आणि लोक प्रश्न विचारत आहेत पण भारतात काहीच होत नाही. भारतात कोणी प्रश्न विचारत नाही. कोणी विचारलाच तर प्रसारमाध्यमांतुन एक ओळही येत नाही, अशी नाराजीही राहुल गांधी यांनी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या