Sunday, May 26, 2024
Homeमुख्य बातम्याMaratha Andolan : फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच; लाठीचार्जवरून शरद पवारांचा हल्लाबोल

Maratha Andolan : फडणवीसांचा माफीनामा म्हणजे गुन्ह्याची कबुलीच; लाठीचार्जवरून शरद पवारांचा हल्लाबोल

जळगाव | Jalgoan

जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. तसंच पोलिसांकडून बेछूट गोळीबार करण्यात आला. यात अनेक आंदोलक जखमी झाले. या सगळ्याचे राज्यभर पडसाद उमटले. अनेक ठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. या घटनेतचा निषेध करण्यात आला. यानंतर ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे.

- Advertisement -

या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर माफी मागितली. यावर राष्ट्रावादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा शरद पवारांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माफी मागणं म्हणजे एकप्रकारे गुन्ह्याची कबुलीच देणं आहे, असं शरद पवार म्हणाले.

शरद पवार म्हणाले की, लाठीहल्ल्याच्या खोलात जाणं सरकारचं काम आहे. ती त्यांच्याकडे सर्व यंत्रणा आहेत. त्या अधिकारांचा त्यांनी वापर करून त्याबाबत चौकशी करावी. कुणी सुचना दिल्या याचं स्पष्टीकरण सरकारने द्यावे. फडणवीस हे सतत गोवारी हत्याकांडाबाबत बोलतात. मात्र,ही घटना 28 वर्षापूर्वीची आहे. आता ती काढण्याची गरज नाही. मात्र, तरीही सांगू इच्छितो की, गोवारी हत्याकांडात लाठीहल्ला झाला नव्हता ती चेंगराचेगरी होती. तर त्यावेळी आदिवासी कल्याण मंत्री असलेले मधुकर पिचड यांनी राजीनामा दिला होता. आणि त्यानंतर मुंबईतील दहशतवादी हल्ल्यानंतर तेव्हाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला होता. या दोन्ही घटनांची प्रेरणा घेऊन होत असलेल्या मागणीनंतर गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहीजे असेही ते यावेळी म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या