Sunday, October 6, 2024
Homeराजकीयसत्ता कशी हातात येत नाही, तेच बघतो…!; शरद पवारांचा एल्गार

सत्ता कशी हातात येत नाही, तेच बघतो…!; शरद पवारांचा एल्गार

बारामती | Baramati

लोकसभा निवडणूक (Loksabha Election) संपताच शरद पवारn (Sharad Pawar) सध्या दुष्काळी दौरा करत आहेत. मागचे दोन दिवस शरद पवार बारामतीत (Baramati) आहेत. यावेळी ते शेतकरी मेळाव्यांना हजेरी लावत आहेत. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीवर भाष्य केलंय.

- Advertisement -

आज दोन्ही सरकारं आमच्या हातात नाहीत. पण कालच्या निवडणुकीत जसं काम झालं तसं काम केलं. तर राज्य सरकार कसं आपल्या हातात येत नाही, तेच मी बघतो. लोकसभेला जे योग्य होतं ते तुम्ही केलं. विधानसभेला सुद्धा जे योग्य आहे ते करा, असं आवाहन शरद पवारांनी केलंय.

तसेच सुप्रिया सुळेंना तुम्ही विजयी केलं. महाराष्ट्रात कुठे ही गेलो तरी चर्चा असायची की बारामतीत काय होणार आहे. लोकांना चिंता वाटायची जेव्हा मतपेटी उघडली तेव्हा कळालं. मी तुम्हाला एवढी खात्री देतो. तुम्हा लोकांच्या मतदारसंघाच नाव हे त्या ठिकाणी गाजवल्याशिवाय राहणार नाहीत, असे शरद पवार म्हटले.

काही लोकं तात्पुरते यशस्वी होतात. मी नेहमी सांगतो, देशात लोकशाहीचं राज्य आहे. या निवडणुकीत वेगळं चित्र होतं. गावचे नेते कुठे होते कोणास ठाऊक? ज्यांना मोठं केलं ते आसपास दिसत नव्हते. मतमोजणी जेव्हा झाली. तेव्हा कळलं की गाव मोठ्या नेत्यांच्या हातात नाही. तुम्हाला निवडणुकीत माहिती होतं काय करायचं. आता आमची जबाबदारी आहे. तुमचं पाणी इतकं खराब आहे की त्यात हात पण नाही घालता येतं. हे पाणी कसं नीट करता येईल, असंही शरद पवार म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या