Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या“मोदी चुकीचं बोलत आहेत, मी मुख्यमंत्री असताना...”; शरद पवारांनी सगळा इतिहासच काढला

“मोदी चुकीचं बोलत आहेत, मी मुख्यमंत्री असताना…”; शरद पवारांनी सगळा इतिहासच काढला

मुंबई | Mumbai

महिला आरक्षण विधेयक लोकसभेत मंजूर झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच विधेयकावरुन काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर निशाणा साधला होता. त्यांच्या याच टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आक्षेप घेत जोरदार हल्लाबोल केला आहे. महिला आरक्षणाबद्दल मोदी जे बोलत आहेत, ते चुकीचं असून यापूर्वी महिला आरक्षणासंदर्भात अनेकदा अनेक निर्णय झालेले आहेत, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

शरद पवार म्हणाले, देशाच्या पंतप्रधान (PM Modi) यांनी काल बोलताना म्हणाले आहेत की संसदेत महिला आरक्षण (women reservation) निर्णय एकमताने घेतला असं सांगितलं. दोन सदस्य सोडले तर कुणीही याला विरोध केला नाही. एक सूचना होती की घटनात्मक दुरुस्ती करताना ओबीसी (OBC) यांना देखील संधी द्यावी अशी मागणी होती. ही पार्श्वभूमी असताना पंतप्रधान मोदींनी काँग्रेस आणि काही लोकांनी नाईलाजने त्यांना पाठींबा दिला तर हे चुकीचं आहे. 1993 साली महाराष्ट्राची माझ्याकडे सूत्र होती. राज्य महिला आयोग आम्ही त्यावेळी स्थापन केला. आपलं राज्य हे पहिलं राज्य होतं. त्यावेळी स्वतंत्र महिला बालकल्याण विभाग सुरू केला. 73 वी घटनदुरुस्ती त्यावेळी झाली.

धक्कादायक! तरुणाने प्रेयसीच्या आई व भावाला जिवंत जाळले, नंतर स्वत:लाही घेतले पेटवून

मोदी म्हणतात या देशात महिला आरक्षणाचा विचारही कोणी केला नाही, पण आम्ही आरक्षण दिलं. मात्र मोदींचं हे विधान पूर्णत: चुकीचं आहे. सर्वात आधी महाराष्ट्राने महिलांना मानाचं स्थान देण्याचं काम केलं, असं शरद पवार म्हणाले. महिलांना आरक्षण देण्याचं काम देखील आम्ही केलं. के आर नारायण उपराष्ट्रपती असताना आम्ही एक मोठं संमेलन देखील घेतलं होतं. 22 जून 1994 ला देशात पहिलं महिला धोरण जाहीर करण्यात आलं. आणि त्यांनतर 30 टक्के आरक्षण महिलांसाठी ठेवण्यात आलं आणि त्यानंतर स्थानीक स्वराज्य संस्था मध्ये 33 टक्के आरक्षण दिलं. असं आरक्षण देणार महाराष्ट्र पाहिलं राज्य होतं आम्ही पहिल्यांदा 11 टक्के जागा मी संरक्षण विभागात असताना तिन्ही दलात राखीव ठेवल्या. असंही पवार म्हणाले.

एकलहरे-बेलापूर रस्त्यावर दरोडा; तरुणाची निर्घृणपणे हत्या, पत्नीला जबर मारहाण

कांद्यावर 40 टक्के निर्यात शुल्क लावणे हे अन्यायकारक आहे. केवळ भारतात नाही. तर याचे आंतरराष्ट्रीय पातळीवर याचे परिणाम होतात. कांदा निर्यातीमध्ये भारतचा मोठा वाटा आहे. ही बाब लक्षात घेतली तर सतत कांदा खरेदी बंद पडणे, निर्यात बंद करणे, एक्सपोर्ट ड्युटी वाढवणे या सातत्याच्या भूमिकेमुळे आपल्या देशात सातत्य नाही. ही प्रतिमा जगभरात तयार होते. ती घातक आहे. असंही पवारांनी सांगितलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या