Saturday, May 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजत्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले…; मोदींच्या टीकेवर शरद पवारांचा पलटवार

त्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले…; मोदींच्या टीकेवर शरद पवारांचा पलटवार

मुंबई | Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमधून शरद पवार यांच्याबद्दल टीका केली होती. ते म्हणाले होते शरद पवार या वयात स्वतः चे कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते पक्ष काय सांभाळणार असे म्हणाले होते. या टीकेला आता शरद पवारांनी सडेतोड उत्तर दिले आहे. मलाही मोदींबद्दल माहिती आहे. त्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले? पण मी त्या स्तरावर जाऊ इच्छित नाही, असा सवाल शरद पवारांनी केला आहे.

मोदींनी केलेल्या या टीकेवरुन पवारांनी प्रतीप्रश्न विचारला. या प्रश्नावर शरद पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली. “मलाही म्हणता येईल की त्यांनी कुठे कुटुंब संभाळले. पण त्या नियमाने मी जाऊ इच्छित नाही. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी बघितली तर ती अतिशय चिंताजनक आहे. पण असे व्यक्तिगत बोलू नये. ते प्रत्येकाने पाळले नाही. आपण ते पाळण्याची भूमिका योग्य आहे,” असे शरद पवारांनी या टीकेवर प्रतिक्रिया नोंदवताना म्हटले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ठाकरे गटाने उमेदवारी नाकारलेले विजय करंजकर आहेत ‘एवढ्या’ कोटींचे मालक

मोदी काय म्हणाले होते
एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शरद पवारांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर प्रश्नाला मोदी म्हणाले होते, “शरदरावांसंदर्भात बोलायचं झाल्यास त्याची समस्या ही राजकीय नाही. त्यांनी महाराष्ट्रातील जनतेला हे कितीही पटवून देण्याचा प्रयत्न केला तरी लोकांना ते कसे पटणार?” असा सवाल उपस्थित केला. पुढे बोलताना मोदींनी, “ही पूर्णपणे त्यांची कौटुंबिक समस्या आहे. हा पूर्णपणे घरातील वाद आहे,” असा दावाही मोदींनी केला. “काम करणाऱ्या पुतण्याला वारसा द्यायचा की मुलीला? त्यामुळे सहानुभूतीऐवजी असा प्रश्न पडतो की जे या वयात कुटुंबाला संभाळू शकत नाही ते महाराष्ट्राला काय संभाळणार?” असा टोला शरद पवारांनी लगावला.

शरद पवार पुढे असेही म्हणाले, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या प्रचारसभेत लोकांची उपस्थिती आणि त्यांचा प्रतिसाद पाहिला तर परिस्थिती वेगाने बदलत असल्याचे दिसून येतेय. ५ वर्षांपूर्वी नरेंद्र मोदींनी मतदारांना जी आश्वासने दिली होती, ती अजूनही पूर्ण केलेली नाही. राज्यातील शेतकरी अस्वस्थ आहे. त्यांची नाराजी पाहता या सरकारला जबरदस्त किंमत मोजावी लागणार, असा इशाराही शरद पवार यांनी दिला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या