Wednesday, October 16, 2024
Homeमुख्य बातम्यादसऱ्याच्या दिवशी शरद पवारांची तोफ धडाडणार

दसऱ्याच्या दिवशी शरद पवारांची तोफ धडाडणार

पुणे | Pune

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फूटल्यापासून शरद पवार पुन्हा एकदा आपला पक्ष जोमाने उभा करण्यासाठी बैठका, सभा घेत आहेत. बीड, येवला, कोल्हापूर यानंतर आता दसऱ्याच्या दिवशी पुण्यात शरद पवारांची तोफ धडाडणार आहे. येत्या २४ ऑक्टोबर रोजी शरद पवार पुण्यात सभा घेणार आहेत.

- Advertisement -

२४ ऑक्टोबरला या संघर्ष यात्रेची सुरुवात होत असून त्या निमित्ताने शरद पवार एक सभा घेणार आहेत. तसेच या यात्रेची सांगता नागपुरमध्ये केली जाणार आहे आणि त्यावेळी देखील शरद पवार हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.

दरम्यान पक्ष फूटीनंतर पुन्हा एकदा पक्ष बांधणीसाठी सुरूवात झाली आहे. अनेक नेत्यांनी शरद पवारांची साथ सोडली आणि अजित पवारांना पाठिंबा दिला. त्यानंतर पुन्हा एकदा पक्ष उभा करण्यासाठी शरद पवार राज्यभर दौरा, सभा, बैठका घेत आहेत.

राष्ट्रवादीतील आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवारांकडून संघटनात्मक बदल करण्यावर भर दिला जात आहे. पश्चिम महाराष्ट्रासह कोकण, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जात आहे. दरवर्षी दसरा मेळाव्याला माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि पंकजा मुंडे हे नेते जाहीर सभा घेत असतात. परंतु आता यावर्षी शरद पवार हे पुण्यात सभा घेणार असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या