Friday, April 25, 2025
Homeमुख्य बातम्यामोठी बातमी! राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार - शरद पवार

मोठी बातमी! राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्त होणार – शरद पवार

मुंबई | Mumbai

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचे आत्मचरित्र ‘लोक माझे सांगाती’ भाग २ या पुस्तकाचे प्रकाशन आज मुंबईत पार पडत आहे. या पुस्तकातून अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस (Ajit Pawar and Devendra Fadnavis) यांच्या पहाटेच्या शपथविधीबाबत मोठा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीची स्थापना कशी झाली? याचा देखील उलगडा या पुस्तकातून करण्यात आला आहे. त्यानंतर आता या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमावेळी शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदाबाबत मोठी घोषणा केली आहे…

- Advertisement -

या कार्यक्रमादरम्यान बोलतांना शरद पवार म्हणाले की, यापुढे तीनच वर्षे राजकारणात राहणार असून लवकरच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होणार असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी नवीन समिती स्थापन करण्यात येणार असून ही नवीन समिती अध्यक्षाबाबत निर्णय घेईल, असे देखील शरद पवार यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता पुढे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कोण असणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

दरम्यान, शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच सभागृहात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आम्ही राजकारणात सक्रिय राहणार नसल्याचे स्पष्ट केले. तसेच शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घ्यावा असे आवाहनही कार्यकर्त्यांनी केले आहे. त्यामुळे कार्यक्रमावेळी एकच गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...