Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्यादेशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद - शरद पवार

देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नोंद – शरद पवार

नाशिक | Nashik

केंद्र सरकारने (Central Government) केलेल्या कांदा निर्यात बंदीच्या विरोधात शेतकरी (Farmer) संतप्त झाला आहे. शेतकऱ्यांच्या याच भावना लक्षात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) कांदाप्रश्नी स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पवारांनी याठिकाणी शेतकऱ्यांशी संवाद साधला…

- Advertisement -

Maratha Reservation : हिवाळी अधिवेशनात ‘या’ दिवशी होणार मराठा आरक्षणाबाबत चर्चा

यावेळी बोलताना पवार म्हणाले की, देशाच्या अर्थव्यवस्थेत नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) शेतकऱ्यांची नोंद आहे. परंतु, सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांच्या कष्टाला किंमत नाही. केंद्र सरकारला शेतकऱ्यांबाबत कुठलीही आस्था नाही. ताटात कांदा मिळतो त्यासाठी शेतकरी कष्ट करतात. मात्र, कांदा निर्यात बंदीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून सरकारने तात्काळ कांद्यावरील निर्यातबंदी (Export Ban) उठवली पाहिजे, असे शरद पवार यांनी म्हटले.

पवार पुढे म्हणाले की, सध्याचे सरकार शेतकऱ्यांचे योग्य धोरण आखणारे नाही. त्यामुळे रस्ता रोको केल्याशिवाय सरकारला कळणार नाही. तसेच निर्णय घेतांना सरकारकडून शेतकरी हिताचा विचार केला जात नाही. त्यामुळे जर शेतकऱ्यांना (Farmers) योग्य मोबदला मिळाला तर आंदोलनाची गरज पडणार नाही, असेही शरद पवारांनी सांगितले.

Nashik Bus Fire News : धावत्या शिवशाही बसला भीषण आग

दरम्यान, नाशिक जिल्ह्यासह राज्यातील इतर भागातील शेतकरी आधीच अवकाळी आणि दुष्काळाचा सामना करत असताना आता केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. त्यामुळे आज शरद पवार यांच्या उपस्थितीत रास्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, गोकुळ पिंगळे, शहराध्यक्ष गजानन शेलार, श्रीराम शेटे, माजी आमदार उत्तम बाबा भालेराव, माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल ,शिवसेना जिल्हाध्यक्ष नितीन आहेर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे यांच्यासह आदी नेते उपस्थित होते.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या