Wednesday, September 11, 2024
Homeमुख्य बातम्याSharad Pawar : "माझं वय झालं म्हणता, तुम्ही माझं..."; शरद पवारांनी वयावरून...

Sharad Pawar : “माझं वय झालं म्हणता, तुम्ही माझं…”; शरद पवारांनी वयावरून टीका करणाऱ्यांना सुनावलं

बीड | Beed

महिनाभरापूर्वी अजित पवारांच्या (Ajit Pawar’) नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादीतील (NCP) एका गटाने बाहेर पडत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये (Shinde-Fadnavis Government) सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवारांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीत फुट पडली असून पक्षात दोन गट पडले आहेत. दुसरीकडे या फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पक्ष बांधणीसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरल्याचे पाहायला मिळत आहे…

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या छगन भुजबळांच्या (Chhagan Bhujbal) येवला मतदारसंघात (Yeola Constituency) पक्ष फुटीनंतर पहिला जाहीर मेळावा घेतला होता. या मेळाव्यास शरद पवारांना तुफान प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर आज बीड (Beed) जिल्ह्यात शरद पवारांनी (Sharad Pawar) दुसरी जाहीर सभा घेतली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अजित पवार गटावर सडकून टीका केली.

राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला बावनकुळेंचे प्रत्युत्तर; म्हणाले, पक्ष उभारण्यासाठी…

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “मला एक जुनी आठवण झाली. त्यावेळी मी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये होतो. महाराष्ट्राचे नेतृत्व स्व. यशवंतराव चव्हाण यांच्याकडे होते, आम्ही त्यांच्या विचारांनी काम करत होतो. त्यावेळी काही लोकांनी खऱ्या नेतृत्वापेक्षा वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बीड जिल्ह्याचे नेतृत्व केशरकाकू क्षीरसागर यांच्याकडे होते. त्यावेळी काकूंनी निष्ठेची बाजू स्वीकारली. कुणी काहीही भूमिका घेतली तरी मी नेत्यांवर असलेल्या श्रद्धेसंबंधी तडजोड करणार नाही. काहीही किंमत मोजावी लागली तरी माघार घेणार नाही. तीच परिस्थिती आज संदीप क्षीरसागर यांच्यामुळे बघायला मिळली, याचा आनंद आहे.” असे शरद पवार यांनी म्हटले.

Nawab Malik : शरद पवार की अजित पवार, कोणासोबत जाणार? नवाब मलिकांनी स्पष्टच सांगितलं

पुढे बोलतांना शरद पवार म्हणाले की, काही लोक माझं वय झालं म्हणतात, तुम्ही माझं काय बघितल. ठीक आहे तुम्हाला सत्तेच्या बाजूने जायचे आहे. पण निदान आयुष्यात ज्यांच्याकडून तुम्ही काही घेतले असेल त्यांच्याबद्दल थोडी माणुसकी ठेवण्याचा प्रयत्न करा. असे जर केले नाही तर लोक तुम्हाला योग्य धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. तसेच मागील आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात असलेल्या रुग्णालयात लोकांचे जीव गेले. लोकांना रुग्णालयात गेल्यावर त्यांना आधार मिळाले पाहिजे. पण सरकार यावर बघ्याची भूमिका घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.

Eknath Shinde : “एकनाथ शिंदे एकट्याच्या जीवावर मुख्यमंत्री झालेले नाहीत”; आमदार भरत गोगावलेंचे जाहीर सभेत विधान

केंद्रातील मोदी सरकार (Modi Government) टीका करतांना ते म्हणाले की, कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही जबाबदारी केंद्र सरकारची असते. आज मणिपूरची अवस्था काय आहे? मणिपूर, नागालँड, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश ही छोटी राज्यं आहेत पण ही महत्त्वाची राज्यं आहेत. प्रत्येक राज्याच्या शेजारी पाकिस्तान तरी आहे किंवा चीन तरी आहे. या दोन्ही देशांची नजर चांगली नाही. संकट आले तर काय होईल यासाठी भारतीय लष्कराला सतर्क रहावे लागते. मणिपूर हे सध्या अशांत आहे. आज मणिपूर पेटले आहे. समाजा-समाजात भांडण झालं, अंतर पडलं. एक वर्ग विरुद्ध दुसरा वर्ग असा तिढा निर्माण झाला. तिथे हल्ले होत आहेत, उद्योग नष्ट केले जात आहेत. स्त्रियांची धिंड काढली जाते आहे. हे सगळं होत असताना देशात बसलेले भाजपाचे (BJP) सरकार कुठल्याच प्रकारची पावले टाकत नाही, असं शरद पवार म्हणाले.

Maharashtra Rain Update : राज्यात आजपासून पावसाचे पुनरागमन? हवामान विभागाचा नेमका अंदाज काय, वाचा सविस्तर

ते पुढे म्हणाले की, मणिपूरमधल्या (Manipur) भगिनींची दुर्दशा झाल्यानंतर आणि त्यांची घरदारं पेटवल्यानंतरही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथल्या समाजातील लोकांना दिलासा देण्यासाठी मणिपूरला जाणे आवश्यक होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. असा आरोप शरद पवार यांनी केला. तसेच संसदेचे अधिवेशन सुरु झाले तेव्हा फक्त तीन मिनिटे ते मणिपूरवर ते बोलले. अविश्वास ठराव आल्यानंतर चार ते पाच मिनिटे बोलले. मात्र तिथल्या भगिनींचे दुःख हे देशाच्या पंतप्रधानांनी समजून घेतले नाही. आज ही स्थिती अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. ही स्थिती बदलायची असेल तर वेगळा विचार करावा लागेल असे शरद पवारांनी यावेळी म्हटले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

धक्कादायक! अल्पवयीन मुलीची तरुणाकडून चाकूने सपासप वार करत हत्या

- Advertisment -

ताज्या बातम्या