मुंबई
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्या भेटीवरून राज्याच्या राजकारणात बराच खल सुरु आहे. राऊत-फडणवीस भेट म्हणजे राज्याच्या राजकारणात काय शिजत आहे का? याचीही चर्चा सुरु झाली आहे. या चर्चांचा पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
होय, मी देवेंद्र फडणवीसांना भेटलो
महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी थेट वर्षा निवासस्थानी पोहचले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा सुरू होती. दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, हे अद्याप कळू शकलेले नाही. मात्र, फडणवीस-राऊत यांच्या भेटीनंतर ही बैठक झाल्यानं वेगवेगळे तर्क लावले जात आहेत.राऊत-फडणवीस भेटीनंतर झालेल्या बैठकीमुळे नव्या चर्चेला विषय मिळाला आहे.महाविकास आघाडीत अस्वस्थता असल्याचे सांगितले जात आहे.
मी संजय राऊत यांना ‘ ही ’ अट घातली