Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजCM Oath Ceremony: फडणवीसांच्या शपथविधीला PM मोदी, अमित शाह लावणार हजेरी, पण...

CM Oath Ceremony: फडणवीसांच्या शपथविधीला PM मोदी, अमित शाह लावणार हजेरी, पण राज्यातील ‘हे’ नेते राहणार अनुपस्थित

मुंबई | Mumbai
भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेणार आहेत. आज सायंकाळी ५.३० वाजता मुंबईतील आझाद मैदानावर हा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार यावेळी फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीही शपथ घेतील. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांना निमंत्रण देण्यात आले आहे. यामध्ये सर्वच पक्षातील दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच इतर काही राज्याचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या आधी भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांना फोन केला आहे. शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी या नेत्यांना फोन केला आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधान सभा निवडणूकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली होती. फडणवीस यांचा भाजपा हा पक्ष महायुतीमध्ये आहे तर शरद पवार यांचा पक्ष महाविकास आघाडीचा सदस्य आहे. शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकमेकांचे राजकीय विरोधक आहेत. हा विरोध निवडणुकीदरम्यान प्रखरतेने दिसला होता. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या पक्षांवर सडकून टीका केली होती. मात्र आता निवडणूक संपली आहे. त्यामुळे राजकीय वैर बाजूला ठेवून फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन कॉल करून शपथविधीच्या कार्यक्रमाला निमंत्रित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उध्दव ठाकरे, राज ठाकरे यांना फोन वरुन शपथविधीच्या कार्यकाला उपस्थित राहण्याचे निमंत्रीत केले. परंतु या नेत्यांना अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे.

- Advertisement -

शपथविधीला उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना फोन केला आहे. मात्र, शरद पवार आजच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचे शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांनी कळवले. राज ठाकरे यांना वैयक्तिक करणास्तव या सोहळ्याला जाणं शक्य नसल्याची माहिती आहे. तर उद्धव ठाकरेंच्या गैरहजेरीचे कारण अद्याप समोर आलेले नाही.

उध्दव ठाकरे उपस्थित राहणार की नाही?
राज्याचे माजी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनादेखील आजच्या शपथविधी कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांनादेखील या कार्यक्रमाला निमंत्रित करण्यात आले आहे. मात्र शपथविधी कार्यक्रमाला ठाकरे उपस्थित राहणार नाहीत त्यामुळे आता चर्चांना उधाण आले आहे.

कोण कोणते नेते उपस्थित राहणार नाही?
आज मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या शपथविधीसाठी राज ठाकरे, शरद पवार, संजय राऊत, नाना पटोले, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे हे नेते उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना फोन करून निमंत्रण दिले होते, मात्र त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव राज ठाकरे येऊ शकणार नाहीत, असे त्यांनी फडणवीसांना कळवले असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना देखील फोन करून शपथविधीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, संसदेचे अधिवेशन सुरू असल्यानं शरद पवार शपथविधीला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले जात आहे. त्याचबरोबर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देखील शपथविधीला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती आहे. नाना पटोले हे आज त्यांच्या मतदार संघात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार असल्याने ते मुंबईतील या सोहळ्याला जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...