Wednesday, May 22, 2024
Homeजळगावपराभूत उमेदवारांना शरद पवार देणार कानमंत्र

पराभूत उमेदवारांना शरद पवार देणार कानमंत्र

जळगाव Jalgaon। प्रतिनिधी

गेल्या विधानसभेसह विविध निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या Nationalist Congress चिन्हावर निवडणूक Election लढवून ती पराभूत Defeated होणार्‍या उमेदवारांसह विजयी Victorious उमेदवारांची मंगळवारी मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार NCP President Sharad Pawar हे बैठक घेणार आहेत.

- Advertisement -

यात पराभूत उमेदवारांना निवडणुकीवेळी आलेल्या अडचणी सोडविण्यासह आगामी निवडणुकांपार्श्वभूमिवर शरद पवार हे उमेदवारांशी चर्चा करणार असल्याची माहिती सोमवार, 16 ऑगस्ट रोजी जळगाव दौर्‍यावर आलेल्या रा.काँ. युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण N.C. Youth State President Suraj Chavan यांनी बोलतांना दिली. बैठकीत पक्ष संघटनात फेरबदल होण्याची शक्यता सूत्रांकडून व्यक्त आहे.

रा.काँ. युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण हे सोमवार, 16 ऑगस्ट रोजी जिल्हा दौर्‍यावर आले. त्यांनी जेडीसीसी बँकेच्या सभागृहात शहर व ग्रामीणची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नेहमी पदाधिकार्‍याच्या बैठका घेत असतात, मात्र कोरोनामुळे वर्ष दीड वर्षापासून या बैठका झालेल्या नाहीत. कोरोनामुळे बैठक न झाल्याने आता गेल्या निवडणुकांमध्ये पराभूत तसेच विजय उमेदवारांची पक्ष अध्यक्ष शरद पवार मंगळवार, 17 ऑगस्ट रोजी बैठक घेत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्था, 2024 विधानसभा निवडणुकाच्या पार्श्वभूमिवर गत काळात जे उमेदवार पराभूत झाले त्यांचे अडचणी, प्र्रश्न काय ते समजून पक्ष अध्यक्ष शरद पवार सोडविणार आहेत. असे रा.काँ. युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी बोलतांना सांगितले.

पक्ष संघटनेतील फेरबदलाबाबत त्यांना विचारले असता, पक्ष संघटनात कुठलेही फेरबदल होणार नसल्याचे स्पष्टीकरण सुरज चव्हाण यांनी दिले.

- Advertisment -

ताज्या बातम्या